Important News : काय सांगता ! ‘ही’ भारतीय कंपनी हजारो अमेरिकन लोकांचे पोट भरणार , कसे? पहा

MHLive24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- बऱ्याचदा भारतीय लोक अमेरिकेत जाऊन नोकरी करताना आपण पाहतो. त्यामुळे बऱ्याचदा भारतीयांमुळे अमेरिकेच्या हक्काच्या नोकरीवर गदा येते असे तेथील लोक आरोप करतात.(Important News)

परंतु आता एक भारतीय कंपनी अमेरिकेत 12 हजार लोकांना नोकऱ्या देणार आहे. दुसऱ्या शब्दांत, ही कंपनी हजारो अमेरिकन लोकांचे पोट भरेल.

पुढील पाच वर्षांत संधी उपलब्ध होईल

Advertisement

इन्फोसिस, टीसीएस, विप्रो आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजसारख्या भारतीय आयटी कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत यूएसमध्ये नोकरभरती वाढवली आहे. अमेरिकन नोकऱ्या आउटसोर्स केल्या जातात हा दावा खोटा ठरवण्याचा हा प्रयत्न आहे.

‘बिझनेस टुडे’च्या रिपोर्टनुसार, आता HCL अमेरिकेत 12,000 लोकांना नोकऱ्या देणार आहे. कंपनी पुढील पाच वर्षात या लोकांना नोकरीच्या संधी देणार आहे.

‘Rise at HCL’ कार्यक्रमाचा भाग

Advertisement

12 हजार लोकांपैकी सुमारे दोन हजार लोकांना येत्या दीड वर्षात एचसीएलमध्ये काम करण्याची संधी दिली जाणार आहे. माहिती देताना कंपनीने सांगितले की, ही नियुक्ती अमेरिकेतील स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ‘Rise At HCL’ या कार्यक्रमाचा एक भाग आहे.

एचसीएल टेक्नॉलॉजीजचे सीईओ आणि एमडी सी विजयकुमार, म्हणाले की, ‘राईज अॅट एचसीएल’ कार्यक्रम फ्रेशर्सना प्रशिक्षण देण्यावर केंद्रित आहे. यामध्ये फ्रेशर्सना जॉब लर्निंगपासून सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटपर्यंतचे प्रशिक्षण दिले जाते.

कोणत्या पदांवर भरती ?

Advertisement

ते पुढे म्हणाले की, या प्रोग्राम द्वारे आम्ही नुकतेच पदवीधर झालेल्या किंवा लवकरच पदवीधर होणार्‍या तरुणांना एचसीएलमध्ये काम करण्यासाठी तयार करू. डेटा अॅनालिटिक्स आणि डिजिटल इंजिनीअरिंग यांसारख्या पदांसाठी नियुक्त करणार आहोत.

ही नियुक्ती अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना, टेक्सास, कॅलिफोर्निया, मिशिगन, मिनेसोटा आणि कनेक्टिकट इत्यादी राज्यांमध्ये केली जाईल.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker