काैटुंबिक हिंसाचाराच्या घटनांत वाढ

MHLive24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना केवळ गरीब, मध्यमवर्गीयांबरोबरच समाजाच्या सर्वच स्तरांत होत असल्याचे उघड झाले. टाळेबंदीमुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांचे गुन्हे दाखल होण्यास काहीसा ‘ब्रेक’ लागला होता; मात्र आता चार भिंतीच्या आतील हुंदके आता बाहेर पडायला लागले आहेत.

समझोत्याचे प्रमाण समाधानकारक :- लग्न झाल्यानंतर पती-पत्नीच्या सुखी संसाराची गाडी काही महिने तरी सुरळीत चालते. त्यानंतर मात्र वेगवेगळ्या कारणांवरून एकमेकांमध्ये खटके उडण्यास सुरूवात होतात. त्यातच पती-पत्नीमध्ये बाहेरील व्यक्तींचा सातत्याने होणारा हस्तक्षेपामुळे वादामध्ये आणखीच तेल ओतण्याचे काम होते.

परिणामी किरकोळ स्वरूपाच्या वादातूनही थेट काडीमोड घेण्यापर्यंतच्या घटना घडतात. गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये अशा घटना सातत्याने घडतात; मात्र आता उच्चभ्रू, श्रीमंत कुटुंबातील स्त्रियादेखील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमधून सुटत नसल्याची सद्यःस्थिती आहे.

Advertisement

गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण आत्यंतिक कमी :- कोरोनापूर्वी २०१९मध्ये पुणे पोलिसांच्या ‘भरोसा सेल’अंतर्गत येणाऱ्या महिला सहाय्यता कक्षाकडे तीन हजार ९९ तक्रार अर्ज आले होते. २०२०मध्ये कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती व टाळेबंदीमुळे महिलांना पोलिसांपर्यंत पोचण्यात अडचणी आल्या.

परिणामी २०२०मध्ये तक्रार अर्जांची संख्या घटून ती २०७४ इतकी झाली. तर जुलै २०२१ पर्यंत १२९४ इतके अर्ज पोलिसांकडे आले आहेत. दाखल अर्जांच्या तुलनेत प्रकरणे निकाली निघण्याचे, त्यांच्यात समझोता घडण्याचे प्रमाण समाधानकारक आहे, तर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण आत्यंतिक कमी असल्याची पोलिसांकडील आकडेवारीतून स्पष्ट होते.

माझ्या मुलीचा काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला आहे, त्यांना आता सव्वा वर्षाचा मुलगाही आहे. आता पती तिच्यावर संशय घेऊन तिला मोठ्या प्रमाणात मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देतो, सतत घराबाहेर काढतो. विश्रांतवाडी पोलिसात तक्रार देऊनही मुलीवरील अत्याचार थांबत नाहीत. मी वृद्ध असून मधुमेही असून तिची या जाचातून सुटका कधी होईल, याकडे डोळे लावून बसले आहे, असे पीडितेच्या आईने सांगितले.

Advertisement

अपेक्षांसाठी अट्टहास :- एकमेकांशी संवाद नाही, त्यातच कोरोनामुळे मने घुसमटलेली आहेत. सुखचैनीचे जगणे आणि सहन करण्याची वृत्ती, या कारणामुळे कुटुंबांमध्ये वाद होतात. विशेषतः उच्चभ्रू कुटुंबांमध्ये पैसा व परिस्थितीची जाणीव नसते. पैशांसाठी गृहीत धरण्याबरोबरच अपेक्षांसाठी अट्टहास केला जातो. त्यातूनच कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडतात. मात्र एकमेकांशी मोकळेपणाने बोलल्यास पुढे वाद सुटू शकतील.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker