आयकर विभागाकडून करदात्यांना दिलासा, सुरु केली ‘ही’ सेवा; अडचणी सुटतील चुटकीसरशी

MHLive24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- आयकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आयकर विभागाने शनिवारी करदात्यांना ‘फेसलेस’ किंवा ई-मूल्यांकन योजनेअंतर्गत तक्रारी दाखल करण्यासाठी तीन अधिकृत ईमेल आयडी जारी केले.

ई-असेसमेंट योजनेअंतर्गत करदाता आणि कर अधिकारी यांच्यात समोरासमोर सामना होत नाही. यामुळे करदात्यांना तक्रारी करणे खूप सोपे होईल. तसेच, त्यांच्या सर्व समस्या सहज सोडवल्या जातील. विभागाने आपल्या अधिकृत ट्विटर पेजवर एक संदेश टाकला की,

करदात्यांच्या चार्टरच्या अनुषंगाने करदात्यांची सेवा आणखी सुधारण्याच्या दृष्टीने, आयकर विभागाने फेसलेस स्कीम अंतर्गत तक्रार दाखल करण्यासाठी समर्पित ई-मेल सुरू केला आहे. विभागाने सांगितले की या हेतूने तयार केलेल्या तीन वेगवेगळ्या ईमेल आयडी अंतर्गत तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात.

Advertisement

फेसलेस असेसमेंट सिस्टीम अंतर्गत, करदात्याला आयकर संबंधित कामांसाठी विभागाच्या कार्यालयात किंवा विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला भेटण्याची गरज नाही. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक-आधारित प्रणाली हे सर्व करेल. ही योजना केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केली होती.

आयकर विभागाने जारी केलेल्या तीन ईमेल आयडींपैकी, फेसलेस असेसमेंट योजनेसाठी samadhan.faceless.assessment@incometax.gov.in, फेसलेस पेनल्टीसाठी samadhan.faceless.penalty@incometax.gov.in आणि samadhan.faceless.appeal@ incometax.gov.in फेसलेस अपीलसाठी वापरता येते.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker