LPG Gas Subsidy :केंद्र सरकारने उपलब्ध केलेल्या योजनांमुळे आजघडीला अनेकांच्या स्वयंपाक घरात गॅस सिलेंडर पोहोचले आहे. पण अजूनही अशी अनेक स्वयंपाकघरे आहेत जिथे एलपीजी सिलिंडर पोहोचलेले नाहीत.

सिलिंडरच्या वाढत्या किमती अनेकांना तोट्याच्या ठरतं आहेत, यामुळे एलपीजी सिलिंडरचे अनेक ग्राहक सरकारी अनुदानावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकार गरीब लोकांसाठी अनुदान देते.

अलीकडेच एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे, तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीतही काही प्रमाणात कपात करण्यात आली आहे.

त्याचवेळी घरात वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरची किंमत अजूनही हजार रुपयांच्या वर आहे. या सगळ्यासोबतच सरकार एलपीजी सिलिंडरमध्ये सबसिडी देणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

सरकारने केलेल्या अंतर्गत मूल्यांकनानंतर असे कळले आहे की सिलिंडर वापरकर्ते सध्या यासाठी 1,000 रुपयांपर्यंत पैसे भरण्याच्या स्थितीत आहेत. अनुदानाबाबत सरकारचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नसला तरी, सरकार या एलपीजी सिलिंडरचे वितरण सर्वाना एकाच किमतीत करेल किंवा काही निवडक लोकांना अनुदानाची सुविधा देईल, असे मानले जात आहे.

सध्याच्या सबसिडीच्या नियमांतर्गत एलपीजी सिलिंडरवर 200 रुपयांपर्यंत सबसिडी सरकारकडून लोकांना दिली जात आहे. सरकारने निवडलेल्या लोकांसाठी अनुदानाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेचा संपूर्ण लाभ मिळू शकेल, असे सांगण्यात येत आहे.

मे 2020 पासून देशातील अनेक ठिकाणी सबसिडी योजना बंद करण्यात आली होती कारण कोरोनाच्या गंभीर महामारीमुळे इंधनाच्या किमती झपाट्याने वाढत होत्या.

मात्र, २०२१ च्या अखेरीस अनेक ठिकाणी अनुदानाची सुविधा पुन्हा सुरू झाली असून लोकांनी त्याचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे.