तुमच्याकडे सोन्याचे जुने दागिने असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

MHLive24 टीम, 23 जुलै 2021 :- आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदार सोने खरेदीला पसंती देतात. कोरोनाच्या काळात तर सोने खरेदी ही उत्तम गुंतवणूक मानली गेली. सोन्याच्या भावात नित्यनियमाने चढउतार झालेले पाहायला मिळतात. दरम्यान, सोन्यावर विविध टॅक्स लागत असतात.

सोने खरेदी करताना आणि विक्री करताना देखील विविध स्वरुपाचे टॅक्स लागत असतात. परन्तु आता सोन्याच्या जुन्या दागिन्यांच्या संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सोन्याच्या जुन्या दागिन्यांच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर सराफांना आता जीएसटी कर भरावा लागणार आहे.

बंगळूरूच्या आद्य गोल्ड प्रा. लि. ने कर्नाटकातील ऑथोरिटी ऑफ अॅडव्हान्स रुलिंगकडे म्हणजे एएआरकडे अर्ज केला होता. त्यात त्यांनी माहिती मागितली होती की जर एखाद्या व्यक्तीकडून सराफाने सोन्याचे जुने किंवा सेकंड हॅंड दागिने विकत घेतले आणि विक्रीच्या वेळेस त्या दागिन्यांच्या स्वरुपात काहीही बदल केला नाही तर त्या सराफाला खरेदी आणि विक्रीतील फरकावर म्हणजे नफ्यावर जीएसटी भरावा लागेल का.

Advertisement

यावर सराफांना केवळ नफ्यावर जीएसटी भरावा लागेल असा निर्णय कर्नाटक एएआरने दिला आहे. यामुळे ग्राहकांनाही संपूर्ण बिलावर जीएसटी भरण्याचा भूर्दंड पडणार नाही आणि सराफांनाही यामुळे फक्त नफ्यावर जीएसटी भरावा लागणार आहे.

ज्वेलर्सवाला जुने दागिने वितळवत नाही :- एखाद्या व्यक्तीकडून जुने किंवा सेकंड हँड सोन्याचे दागिने विकत घेतल्यास आणि विक्रीच्या वेळी त्या दागिन्यांच्या खरेदी-विक्री किमतीतील फरकावर जीएसटी द्यावा लागणार आहे. एएआरच्या कर्नाटक खंडपीठाने हा निर्णय दिलाय.

जीएसटी रक्कम केवळ विक्री किंमत आणि खरेदी किमतीच्या फरकावरच आधारित असेल, कारण ज्वेलर्सवाला जुने दागिने वितळवत नाही. त्यामुळे त्यातून नवीन दागिने तयार होत नाहीत. त्याऐवजी ग्राहक जुन्या दागिन्यांची साफसफाई आणि पॉलिश करीत आहे आणि त्याच्या रूपात कोणतेही बदल करीत नाही.

Advertisement

या निर्णयामुळे सेकंड हँड ज्वेलरीच्या पुनर्विक्रेत्यावरील जीएसटी कमी होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या हा उद्योग खरेदीदारास मिळालेल्या एकूण विक्री किंमतीच्या ३ टक्के इतका जीएसटी आकारतो. एएमआरजी अँड असोसिएट्‌सचे वरिष्ठ भागीदार रजत मोहन म्हणाले, बहुतेक ज्वेलर्स जुने दागिने खरेदी करतात. जीएसटी केवळ खरेदी किंमत आणि विक्री किमतीच्या फरकावरच द्यावा लागणार, असे ते म्हणाले.

सोन्याच्या जुन्या दागिन्यांच्या पुनर्विक्रीतील जीएसटीत होईल घट :- तज्ज्ञांच्या मते या निर्णयामुळे सोन्याच्या जुन्या दागिन्यांची पुन्हा विक्री करताना आकारल्या जाणाऱ्या जीएसटी करात घट होईल. सध्या सराफ ग्राहकाकडून संपूर्ण दागिन्यांच्या किंमतीच्या ३ टक्के इतका जीएसटी कर घेतात.

एएमआरजी अॅंड असासिएट्सचे भागीदार रजत मोहन यांच्या म्हणण्यानुसार बहुतांश सराफ ग्राहकांकडून किंवा बिगर नोंदणीकृत डिलरकडून सोन्याचे जुने दागिने विकत घेतात. यामुळे सराफांना जीएसटी भरण्याची आवश्यकता राहत नाही.

Advertisement

कर्नाटक एएआरने दिलेल्या निर्णयानुसार आता खरेदी आणि विक्री यांच्यातील फरकावर म्हणजे नफ्यावर जीएसटी कर द्यावा लागणार आहे. याचा सराफा बाजाराच्या व्यवसायावर चांगला परिणाम होईल आणि सर्वसामान्य ग्राहकांना एकूण बिलावर कमी जीएसटी कर भरावा लागेल.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker