कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण निर्णय; 31 ऑगस्टपर्यंत…

MHLive24 टीम, 31 जुलै 2021 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा 31 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परंतू, वंदे भारत मिशनद्वारे हवाई दला अंतर्गत दोन देशांदरम्यान विमानसेवा सुरू राहणार आहे. कोरोनामुळे 23 मार्च 2020 रोजी देशातील शेड्युल व्यावसायिक आंतरराष्ट्रीय उड्डाणांची सेवा थांबविली गेली आहे.

गेल्या 17 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची सामान्य सेवा विस्कळीत झाली आहे. फ्लाईट निलंबनासंदर्भात डीजीसीएकडून नवीन आदेश जारी करण्यात आला आहे. हा नियम आंतरराष्ट्रीय मालवाहू विमानांना लागू होणार नाही.

देशात शेड्युल व्यावसायिक आंतरराष्ट्रीय उड्डाणांची सेवा थांबविली :- कोरोनामुळे 23 मार्च 2020 रोजी देशातील शेड्युल व्यावसायिक आंतरराष्ट्रीय उड्डाणांची सेवा थांबविली गेली. गेल्या 17 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची सामान्य सेवा विस्कळीत झालीय. फ्लाईट निलंबनासंदर्भात डीजीसीएकडून नवीन आदेश जारी करण्यात आलाय. हा नियम आंतरराष्ट्रीय मालवाहू विमानांना लागू होणार नाही.

Advertisement

वंदे भारत मिशनअंतर्गत एअर बबल अंतर्गत आंतरराष्ट्रीय हवाई सेवा सुरू :- कोरोना संकट सुरू झाल्यापासून शेड्युल आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा बंद केली गेली. गेल्या एक वर्षापासून वंदे भारत मिशनअंतर्गत एअर बबल अंतर्गत आंतरराष्ट्रीय हवाई सेवा सुरू आहे.

एप्रिल महिन्यात जेव्हा दुसर्‍या लाटेचा धोका वाढला, तेव्हा डझनभर देशांसह हवाई संपर्क पुन्हा एकदा बंद झाला. सुमारे 20 देशांनी भारतातून ये-जा करणाऱ्या प्रवासी विमानांवर बंदी घातली होती. दुसरी लाट संपल्यानंतर स्वित्झर्लंड, फ्रान्स, जर्मनी, मालदीव, कतारसारख्या देशांनी पुन्हा हवाई संपर्कांना परवानगी दिली.

जूनमध्ये काय होती पसिरिस्थिती ? :- डीजीसीएच्या अहवालानुसार जूनमध्ये सुमारे 31.13 लाख स्थानिक प्रवाशांनी हवाई मार्गाने प्रवास केला. ही संख्या मे महिन्यात प्रवास केलेल्या 21.15 लाखांपेक्षा 47 टक्के अधिक आहे. नागरी उड्डयन संचालनालयाच्या नुसार एप्रिलमध्ये 57.25 लाख लोकांनी हवाई मार्गाने देशभर प्रवास केला.

Advertisement

मे महिन्यात देशांतर्गत हवाई वाहतुकीत झालेली घट कोविड 19 साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे झाली होती. डीजीसीएच्या आकडेवारीनुसार, इंडिगोने जूनमध्ये 17.02 लाख प्रवासी वाहून नेले, जे देशांतर्गत बाजाराच्या 54.7 टक्के होते. एकूण स्पाईसजेटने 2.81 लाख प्रवाशांसह उड्डाण केले, जे एकूण देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या 9 टक्के होते.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker