Electric Car : पेटोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक वाहनांना आलेलं डिमांड पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा विचार करतं आहेत.

ग्राहकांचा कल लक्षात घेता कंपण्यानी देखील EV मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. Tata Motors, Mahindra, MG Motors, Hyundai सारख्या प्रमुख कार कंपन्यांनी या विभागात त्यांची उत्पादने लाँच केली आहेत.

वास्तविक पेट्रोल आणि डिझेलच्या या वाढत्या किमती पाहता तुमचा सर्वांचा कल इलेक्ट्रिक कारकडे वाढतोय. पण आजही जगात ईव्हीच्या किमती खूप जास्त आहेत. बरेच लोक इलेक्‍ट्रिक कार खरेदी करू शकत नाहीत कारण त्यांच्या किमती खूप जास्त आहेत.

पण आता देशातील प्रत्येक सामान्य माणूसही इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकतो. जर तुम्ही देखील खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला SBI कडून खूप स्वस्तात कर्ज मिळेल. पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेत हीच बँक तुमच्याकडून कमी व्याज आकारेल.

SBI ग्रीन कार लोन अंतर्गत, आता इलेक्ट्रिक वाहनांवरील व्याजदर इतर कोणत्याही वाहनांपेक्षा 20,000 रुपये कमी असेल. मर्यादा 3 वर्षे ते 8 वर्षांच्या दरम्यान असणार आहे जेणेकरून तुम्ही या वर्षांमध्ये पेमेंट करू शकता. इतर सर्व कारसाठी कर्ज मर्यादा सध्या 7 वर्षे आहे.

परंतु SBI च्या ग्रीन कार लोन अंतर्गत, कर्ज इलेक्ट्रिक कारच्या ऑन-रोड किमतीच्या 90 टक्के कव्हर करेल. इलेक्ट्रिक कार खरेदीवर सरकार अनेक कर सूट देते. काही राज्यांमध्ये, ईव्ही पूर्णपणे करमुक्त करण्यात आल्या. SBI कर्जानुसार, इलेक्ट्रिक कारचा व्याज दर 7.5 ते 7.95% दरम्यान असेल.

हा व्याजदर अशा ग्राहकांसाठी आहे जे ३ ते ५ वर्षांच्या कालावधीत कर्जाची परतफेड करणार आहेत. कर्ज घेण्यासाठी, ग्राहकांना त्यांचे 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट, पासपोर्ट, ओळखपत्र, पॅन कार्ड, सादर करावे लागेल.

मतदार ओळखपत्रासह इतर काही कागदपत्रे द्यावी लागतील जी पत्त्याचा पुरावा म्हणून स्वीकारता येतील. जर एखाद्या व्यावसायिकाने या कर्जासाठी अर्ज केला तर त्याला त्याचे 2 वर्षांचे परतावा दाखवावे लागेल, तर जमीन मालकाला त्याच्या जमिनीची कागदपत्रे द्यावी लागतील.