LIC Scheme : घर बांधून भाड्याने देण्यापेक्षा एलआयसीच्या च्या ‘ह्या’ योजनेत पैसे गुंतवले तर दर महिन्याला अकाउंटमध्ये येतील 45 हजार रुपये

MHLive24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- कोरोनाच्या महामारीमध्ये अनेकांना बचत आणि गुंतवणुकीचे महत्व समजले आहे. अनेक लोक गुंतवणूक आणि इन्कमसाठी विविध मार्ग चोखाळतात. यापैकी एक म्हणजे घरभाडे. घर बांधून ते भाड्याने देणे आणि त्याच्या पैशातून रिटायर्टमेंटचं आयुष्य निवांत जगणे असं अनेकांचं गणित असते.(LIC Scheme)

मात्र LIC ने अशा घरमालकांसाठी एक शानदार योजना आणली आहे. या योजनेमुळे गुंतवणुकीच्या दुसऱ्याच महिन्यापासून तुम्हाला पेन्शन सुरु होते.

LIC च्या या खास योजनेचं नाव जीवन अक्षय पॉलिसी आहे. या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे, गुंतवणुकीच्या पुढच्याच महिन्यापासून रिटर्न मिळणं सुरु होतं.

Advertisement

आयुष्यभर पेन्शन रुपात पैसे मिळणे सुरु होतं. सध्याच्या काळात सुरक्षित भविष्यासाठी जीवन विमा हा खूप महत्त्वाचा आहे. आयुर्विमा क्षेत्रातील भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ग्राहकांसाठी नेहमीच खास योजना आणत असते

दरमहा पेन्शनची व्यवस्था

एलआयसीने बऱ्याच पॉलिसी सादर केल्या आहेत ज्यात गुंतवणूक केल्यावर तुम्हाला ग्यारंटेड उत्पन्न मिळेल. कष्टाने मिळवलेले पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करणे शहाणपनाचे मानले जाते. बर्‍याचदा लोक पैसे बुडवण्याचा धोका असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करतात.

Advertisement

एलआयसी पॉलिसीद्वारे आपण दरमहा पेन्शनची व्यवस्था करू शकता. भारतीय जीवन विमा महामंडळाच्या (एलआयसी) जीवन अक्षय पॉलिसीमध्ये एखादी व्यक्ती गुंतवणूक करू शकते.

या एन्यूटी पॉलिसीद्वारे प्रत्येक महिन्याला स्वत: साठी किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी एकरकमी गुंतवणूक करून निवृत्तीवेतनाची व्यवस्था केली जाऊ शकते.

ही पॉलिसी कोण घेऊ शकते

Advertisement

कोणताही भारतीय नागरिक ही पॉलिसी घेऊ शकतात. या योजनेत गुंतवणूकीची कमाल मर्यादा नाही. जीवन अक्षय अंतर्गत केवळ 30 ते 85 वर्षे वयोगटातील लोक पात्र आहेत.

टॅक्स आणि गुंतवणूकीचे नियम

लक्षात ठेवा की या धोरणांतर्गत आपल्याला आयकर कलम 80 सी अंतर्गत कर देखील भरावा लागेल. या पॉलिसीबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे पॉलिसी घेतल्यानंतर 3 महिन्यांनंतर तुम्ही गरजेच्या वेळी कर्ज घेऊ शकता.

Advertisement

भाड्याच्या घरापेक्षा फायदा कसा?

LIC च्या माहितीनुसार, जीवन अक्षय योजनेत जर एका घराच्या किंमतीची रक्कम गुंतवल्यास, भाड्याच्या रकमेपेक्षा पेन्शनरुपी मिळणारी रक्कम अधिक आहे. समजा 1 कोटी रुपये गुंतवल्यास, दर महिन्याला जवळपास 43 हजार रुपये पेन्शन मिळेल. ही पेन्शन आजीवन असेल.

महत्त्वाचं म्हणजे ही रक्कम सुरक्षित तर असतेच, शिवाय 3 वर्षानंतर तुम्ही कधीही तुमची गुंतवलेली रक्कम काढू शकता. दुसरीकडे जर 1 कोटीचं घर बांधलं तर तुम्हाला जास्तीत जास्त 25 ते 35 हजारापर्यंत भाडे मिळू शकते. एरियानुसार भाडेदर वेगवेगळा असू शकतो. पण जीवन अक्षय योजनेत तुम्हाला खात्रीशीर पेन्शन मिळेलच.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker