News for PF account holders : तुमचेही पीएफ खाते असेल तर त्वरित मार्गी लावा ‘हे’ काम

MHLive24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO आपल्या ग्राहकांना अनेक सुविधा पुरवत असते. भविष्य उज्वल होण्यासाठी प्रत्येक कर्मचारी यात सहभागी होऊन गुंतवणूक करत असतो. आजकाल, ईपीएफओच्या सदस्यांशी संबंधित सर्व काम ऑनलाइन केले जाऊ शकते.(News for PF account holders)

त्याचप्रमाणे त्याची ई-नॉमिनेशन सेवाही ऑनलाइन करता येईल. यासाठी तुम्ही ईपीएफओच्या वेबसाइटवर हे काम घरी बसून सहज करू शकता. जर तुम्हाला ईपीएफओच्या सर्व सुविधांचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला तुमचे नामांकन करावे लागेल.

यासाठी तुम्हाला EPFO कार्यालयात जाण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला घरी बसून ई-नॉमिनेशन कसे करायचे ते सांगणार आहोत.

Advertisement

ईपीएफओने ट्विट करून माहिती दिली

EPFO ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आपल्या सदस्यांना यासंबंधी माहिती देण्यासाठी एक ट्विट केले आहे. ईपीएफओने या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘ईपीएफ सदस्य विद्यमान ईपीएफ/ईपीएस नामांकन बदलण्यासाठी नवीन नामांकन दाखल करू शकतात.

नवीनतम पीएफ नामांकनामध्ये नमूद केलेल्या नामनिर्देशित व्यक्तीचे नाव अंतिम मानले जाईल, तर खातेधारकाने नवीन नामांकन केल्यानंतर, पूर्वीचे नामांकन रद्द केले गेले असे मानले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेची स्टेप बाय स्टेप प्रॉसेस बद्दल जाणून घेऊया.

Advertisement

स्टेप बाय स्टेप प्रॉसेस

1. सर्वप्रथम तुम्हाला EPFO वेबसाइटवर जावे लागेल (https://www.epfindia.gov.in/site_en/index.php) आणि सर्व्हिसच्या पर्यायावर क्लिक करा.
2. नंतर For Employees विभागावर क्लिक करा.  री-डायरेक्ट केल्यानंतर, तुम्हाला सदस्य UAN / ऑनलाइन सेवा पर्यायावर क्लिक करावे लागेल.
3. यानंतर ग्राहकाला अधिकृत सदस्य ई-सेवा पोर्टलवर रीडायरेक्ट केले जाईल, जेथे UAN आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करावे लागेल.
4. यानंतर ड्रॉप डाउन मेनूमधील मॅनेज टॅबवर जा आणि ई-नामांकन निवडा. यामध्ये होय पर्याय निवडा आणि फॅमिली डिक्लेरेशन अपडेट करा.
5. Add Family Details  वर क्लिक करा आणि नामांकन तपशील निवडा ज्यातून तुम्ही शेअर करायची एकूण रक्कम घोषित करू शकता.
6. यानंतर सेव्ह ईपीएफ नॉमिनेशनवर क्लिक करा. पुढील पेज वर गेल्यानंतर, ई-साइन पर्यायावर क्लिक करा.
7. तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल, त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल.

EPF म्हणजे काय?

Advertisement

EPFO आपल्या सब्सक्राइबर्सना त्यांच्या रिटायरमेंटनंतर फंड आणि पेन्शन सुविधा प्रदान करते. ग्राहकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला कौटुंबिक पेन्शन आणि विम्याचे पैसे मिळतात. याशिवाय गरज भासल्यास EPF खात्यातून पैसे काढता येतात.

EPFO ने अलीकडेच कर्मचारी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) योजनेच्या सदस्यांसाठी विमा लाभ वाढवला आहे. ती अडीच लाखांवरून सात लाख रुपये करण्यात आली आहे. पूर्वी ही मर्यादा 2 लाख ते 6 लाख रुपये होती.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker