औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या वाढली तर पूर्णपणे लॉकडाऊन करणार !

Mhlive24 टीम, 07 मार्च 2021:अहमदनगर : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता येत्या दि.११ मार्चपासून औरंगाबादेत अंशत: लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादमधील कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊन याबाबत नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

या लॉकडाऊनसाठी लवकरच नवी नियमावली जारी केली जाणार असून, यानुसार राजकीय सामाजिक सभा, आठवडी बाजार, क्रीडा स्पर्धा, शाळा, महाविद्यालय, बंद असणार आहे. तसेच शहरातील मंगल कार्यालये बंद राहणार आहेत. त्यामुळे आता विवाह सोहळ्यांचे देखील आयोजन करण्यात येणार नाहीत.

आज झालेल्या या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे रात्री ९ पर्यंत हॉटेल सुरु राहणार आहे. मात्र त्यानंतर हॉटेल बंद ठेवण्यात येणार आहे. परंतू रात्री ११ पर्यंत होम डिलिव्हरी सुरु ठेवण्यात येणार आहे. तसेच ग्रंथालयही अर्ध्या क्षमतेने सुरु राहणार आहेत.

Advertisement

मात्र शनिवार व रविवारी पूर्णत: लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या दिवशी केवळ अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत. मात्र यानंतरही जर कोरोना बाधीतांच्या संख्येत वाढ झाली तर मात्र औरंगाबादमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker