‘चॉकलेट खाण्याऐवजी त्याच्या किमतीएवढा ‘हा’ ‘ शेअर घेतला असता तर आज मिळाले असते लाखो रुपये

MHLive24 टीम, 31 जुलै 2021 :-  गुंतवणूकीसाठी बरेच पर्याय आहेत. एफडी, पोस्ट ऑफिस योजना, बॉन्ड, सोने-चांदी, डिबेंचर्स आणि म्युच्युअल फंड आदी. पण शेअर बाजार सर्वाधिक परतावा देऊ शकेल. शेअर बाजार अशी जागा आहे जिथे तुमचे पैसे त्वरीत दुप्पट, तिप्पट किंवा इतर गुंतवणूकीच्या पर्यायांपेक्षा अधिक असू शकतात.

तथापि, शेअर बाजाराचे धोके देखील आहेत आणि इतर पर्यायांपेक्षा अधिक माहितीची यात आवश्यकता असते. परंतु जर एखाद्या गुंतवणूकदारास चांगला शेअर मिळाला तर केवळ एक शेअर भाग्य बदलू शकेल. असाच एक छोटा पॅकेट बडा धमाका केला आहे गीता रिन्यूएबल एनर्जी या कंपनीने.

हा एक पेनी स्टॉक होता, म्हणजे या शेअरची किंमत फक्त ५ रुपये होती. मात्र फक्त १२ महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना थोडेथोडका नव्हे तर ४,००० टक्क्यांचा परतावा दिला आहे. श्रीमंत कसे व्हावे या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असणाऱ्यांसाठी असे शेअर म्हणजे लॉटरीसारखेच असतात.

Advertisement

२९ जून २०२०ला गीता रिन्यूएबल एनर्जीच्या शेअरची किंमत ५.५० रुपये प्रति शेअर इतकी होती. आज मुंबई शेअर बाजारात हाच शेअर २०३.८५ रुपये प्रति शेअर या पातळीवर व्यवहार करतो आहे.

म्हणजेच आपण एखादे चॉकलेट विकत घेतो तितकीच याची किंमत होती. अशा कंपनीचे शेअर्स जर एखाद्याने नियमितपणे विकत घेतले असते, तर फार थोड्या गुंतवणुकीत त्याला जबरदस्त कमाई करता आली असती. गीता रिन्यूएबल एनर्जीच्या शेअरमध्ये मागील वर्षी जून महिन्यात गुंतवणूक करणाऱ्याला फकत्त वर्षभरातच ४,००० टक्क्यांचा परतावा मिळवता आला असता.

गीता एनर्जी रिन्यूएबलच्या शेअरमध्ये गुंतवलेल्या फक्त ५,००० रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज २ लाख रुपये झाले असते किंवा जर एखाद्या गुंतवणुकदाराने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते तर आजे त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य तब्बल ४० लाख रुपये झाले असते. या तुलनेत सेन्सेक्समध्ये फक्त ३८.३७ टक्क्यांची वाढ वर्षभरात झाली आहे.

Advertisement

गीता रिन्यूएबल एनर्जीच्या शेअरच्या किंमतीत २,७९७ टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील फक्त एका महिन्यात या शेअरने १५४ टक्क्यांची तेजी दाखवली आहे. मुंबई शेअर बाजारात या शेअरला ५ टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते. फक्त २१ दिवसांतच या शेअरच्या किंमत १५४.२९ टक्क्यांनी वाढली आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker