‘ह्या’ बँकेची भारी सुविधा; पेट्रोल भरल्यानंतर फास्टॅगद्वारे देता येतील पैसे , वाचा…

file photo

MHLive24 टीम, 18 जुलै 2021 :- इंडियन ऑईल आणि आयसीआयसीआय बँक यांनी एका विशेष सुविधेसाठी हात मिळवला आहे. याअंतर्गत आपण इंडियन ऑईलच्या सर्व पेट्रोल पंपांवर कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट करण्यास सक्षम असाल. आयसीआयसीआय बँकेच्या फास्टॅग वापरकर्त्यांना इंडियन ऑईल पेट्रोल पंपांवर पूर्णपणे डिजिटल अनुभव घेता येणार आहे.

यामध्ये, ग्राहकांच्या वतीने डिझेल-पेट्रोलचे पेमेंट थेट त्याच्या फास्टॅगद्वारे केले जाईल. फक्त हेच नाही, तर तुम्ही फास्टॅग च्या माध्यमातून लुब्रिकेंट्सचे पैसे देखील देऊ शकाल.

Advertisement

या विशेष उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात एकूण 3000 इंडियन ऑइल रिटेल आउटलेट्स कव्हर करण्यात येतील.इंडियनऑयलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य म्हणाले की इंडियन ऑयल आणि आयसीआयसीआय बँक यांनी एकत्रित सुरू केलेली fastag पेमेंट सुविधा ही डिजिटल इंडियाला बळकटी देण्यासाठीचा एक पुढाकार आहे.

यामुळे आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना एक उत्तम डिजिटल अनुभव मिळेल.या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रथम ग्राहकांना पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या कर्मचाऱ्यास fastag द्वारे पैसे द्यायचे असल्याची सूचना द्यावी लागेल.

Advertisement

यानंतर कर्मचारी आपल्या कारवरील fastag स्कॅन करेल, त्यानंतर ओटीपी येईल. जेव्हा हा ओटीपी पीओएस मशीनमध्ये प्रविष्ट केला जाईल तेव्हाच व्यवहार पूर्ण होईल.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement