How to apply unique ID for jewellery : आता प्रत्येक दागिन्यांना एक युनिक आयडी मिळणार, जाणून घ्या सरकारची योजना

MHLive24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- देशभरातील ग्राहकांना फायदा व्हावा म्हणून सरकारने आता सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. परंतु आता देशात सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगची सर्वसमावेशक रचना तयार होईपर्यंत सरकारनं हा निर्णय लागू करायला नको असे व्यापाऱ्यांचे मत आहे.(How to apply unique ID for jewellery)

दुसरीकडे सरकार मानते की, नियम लागू केले गेले आणि हॉलमार्किंगचे काम चालू राहिल्यानंतरही पायाभूत सुविधा तयार होऊ शकतात.

दागिन्यांवरील हॉलमार्किंग एक युनिक आयडी असेल, ज्याला तांत्रिक भाषेत हॉलमार्किंग युनिक आयडी किंवा एचयूआयडी म्हणून ओळखले जाईल.

Advertisement

युनिक आयडी हॉलमार्किंग सेंटरशी जोडला जाणार

हे HUID त्या दुकानाशी जोडले जाईल, जिथून दागिने विकले जातील. हा युनिक आयडी हॉलमार्किंग सेंटरशी जोडला जाईल, जिथून अचूकतेवर शिक्कामोर्तब होईल. या दोन प्रकारच्या आयडींचा मोठा फायदा असा होईल की, कोणत्या दुकानातून आणि कोणत्या केंद्रातून दागिने बाहेर पडले आहे हे दागिने शोधण्यात सरकार सक्षम असेल.

दागिन्यांच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची भेसळ किंवा फसवणूक झाल्यास ज्वेलर्सचे दुकान आणि हॉलमार्किंग सेंटरवर कारवाई करणे सोपे जाणार आहे. दागिन्यांची शुद्धता राखण्यासाठी आणि ग्राहकांना भेसळयुक्त सोने मिळू नये, यासाठी सरकारला प्रत्येक दागिन्यावर युनिक आयडी देण्याची इच्छा आहे. हा युनिक आयडी HUID म्हणून ओळखला जाईल.

Advertisement

HUID म्हणजे काय?

HUID (गोल्ड हॉलमार्क युनिक आयडी) हा एक नंबरसारखा आहे, जो तुमच्या आधार किंवा पॅन सारखा असू शकतो. HUID अंतर्गत प्रत्येक दागिन्यांना एक विशिष्ट ओळख क्रमांक दिला जातो. हा आयडी सांगेल की, दागिने कोठून विकले गेले आणि विकल्यानंतर ते कोणाच्या हातात गेले.

कोणत्या सोनाराने हे दागिने विकले, कोणत्या खरेदीदाराने ते विकत घेतले, ते दागिने काही लॉकरमध्ये ठेवले होते, ते वितळले गेले आणि पुन्हा दागिने बनवले गेले आणि पुढे विकले गेले. ही सर्व माहिती त्या HUID मध्ये नोंदवली जाईल.

Advertisement

काय आहे हॉलमार्क ?

हॉलमार्क ही एक प्रकारची हमी आहे. या अंतर्गत, भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) प्रत्येक सोन्याच्या दागिन्यांवर त्याच्या चिन्हाद्वारे शुद्धतेची हमी देते. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे विश्वासार्हता प्रदान करण्याचे एक साधन आहे. जर दागिन्यांना हॉलमार्क केले असेल तर याचा अर्थ त्याची शुद्धता प्रमाणित आहे. बीआयएस चिन्ह प्रमाणित करते की दागिने भारतीय मानक मानकांशी जुळतात.

काय आहेत व्यापाऱ्यांच्या मागण्या

Advertisement

HUID हॉलमार्किंग प्रक्रिया केंद्रांवर केली पाहिजे आणि त्याचा भुर्दंड व्यापाऱ्यांना बसू नये.

40 लाखांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या ज्वेलर्सकडून परवाना मागू नये.

256 जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर ठिकाणी हॉलमार्क केलेले दागिने विकण्यासाठी परवानेही मागितले जात आहेत.

Advertisement

सध्या हॉलमार्किंगला पाच ते पंधरा दिवस लागत आहेत, ते एका दिवसात उपलब्ध झाले पाहिजेत.

केंद्रांवर चुकीचे HUID दिल्यानंतर आणि प्रमाणपत्रे दिल्यानंतर व्यापाऱ्यांना जबाबदार धरू नये.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker