गृहनिर्माण संस्थेच्या निवडणुका आॅगस्टनंतर

MHLive24 टीम, 30 जुलै 2021 :-  सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका वारंवार पुढे ढकलल्यामुळे बहुतांश सोसायट्यांमधील पदाधिकारी त्रासले आहेत. त्यामुळे सोसायटीच्या कामकाजावर परिणाम होत आहे. गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी सोसायट्यांकडून केली जात आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे ऑगस्टनंतर निवडणुका होतील, अशी पदाधिकाऱ्यांना अपेक्षा आहे.

निवडणुका घ्या; पण नियमावली नाही :- अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका त्यांनी स्वत:च घ्याव्यात, असा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता; परंतु निवडणुका कशा घ्याव्यात, याबाबत नियमावली नव्हती.

सहकार विभागाकडून त्याला विलंब होत असल्यामुळे सोसायट्यांच्या संचालक मंडळाला ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली होती. विधानसभा निवडणुकीनंतर नियमावली जाहीर करण्यात येईल, अशी अपेक्षा होती; परंतु ते शक्य झाले नाही.

Advertisement

कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर :- महाविकास आघाडी सरकारने कृषी कर्जमाफी आणि मार्चनंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणुका पुन्हा ३१ डिसेंबर २०२० पर्यंत पुढे ढकलल्या. नियमावली जाहीर झाल्यानंतर निवडणुका होतील, अशी अपेक्षा होती; परंतु पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे कारण देत राज्य सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या.

राज्य सरकारकडून या सततच्या मुदतवाढीच्या निर्णयाला अनेक सोसायट्यांमधील पदाधिकारी त्रासले आहेत. संचालकांची मुदत संपूनही कामकाज करावे लागत आहे, तर दुसरीकडे सोसायटीच्या सेवेसाठी काही सभासदांना निवडणूक लढविण्याची इच्छा आहे; परंतु निवडणुकीला मुदतवाढ मिळत असल्यामुळे इच्छुक सभासदांचाही हिरमोड होत आहे.

गृहनिर्माण संस्थांची स्थिती

Advertisement
  • राज्यातील गृहनिर्माण संस्थाः सुमारे एक लाख
  • अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या संस्थाः ८५ हजार
  • पुणे जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थाः १८ हजार
  • अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या संस्थाः १५ हजार
  • गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका रखडल्यामुळे कामेही रखडली

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker