Discount on Honda cars: कार घ्यायचीये ? Honda ‘ह्या’ मॉडेल्सवर देत आहे आकर्षक डिस्काउंट

MHLive24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- सध्या ऑटो सेक्टरमध्ये कमालीची स्पर्धा आहे. तसेच कोरोनाच्या काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्या विविध ऑफर आणत असतात. आता Honda ने डिसेंबर महिन्यात आपल्या निवडक कार्सवर एक आकर्षक सवलत ऑफर आणली आहे, ज्यामध्ये Honda च्या कारच्या खरेदीवर 45 हजार रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकतो.(Discount on Honda cars)

कॅश बेनिफिट व्यतिरिक्त होंडाने जारी केलेल्या डिस्काउंट ऑफरमध्ये एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सवलत आणि विनामूल्य अॅक्सेसरीजचे फायदे देखील दिले जात आहेत. कंपनीची ही सवलत ऑफर 31 डिसेंबर 2021 पर्यंत लागू आहेत. चला जाणून घेऊयात कोणत्या मॉडेल्सवर काय ऑफर मिळतिये ते…

Honda City 5th Generation: Honda City ही एक प्रीमियम सेडान आहे जी तिच्या प्रीमियम डिझाइन आणि फीचर्स साठी लोकप्रिय आहे. कंपनी या कारच्या 5व्या जनरेशन मॉडेलवर 45,108 रुपयांपर्यंत सूट देत आहे, ज्यामध्ये 7,500 रुपयांची रोख सूट दिली जात आहे, रोख सूट व्यतिरिक्त, तुम्ही 8,108 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीजची निवड करू शकता.

Advertisement

ज्यासोबत 15 हजार रुपयांचा कार एक्स्चेंज बेनिफिट, 5 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि 9 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 8 हजार रुपयांची कॉर्पोरेट सूटही दिली जात आहे. होंडा सिटीची प्रारंभिक किंमत 11.16 लाख रुपये आहे. टॉप मॉडल 15.11 लाख रुपयांपर्यंत जाते.

Honda Jazz: Honda Jazz ही स्पोर्टी डिझाईन असलेली प्रीमियम हॅचबॅक आहे, जी तिच्या फीचर्ससाठी आणि डिझाइनसाठी पसंत केली जाते. होंडा या कारवर 35,147 रुपयांपर्यंत सूट देत आहे, ज्यामध्ये 10,000 रुपयांची रोख सूट आहे. याशिवाय तुम्ही रु. 12,147 पर्यंतच्या मोफत अॅक्सेसरीजची देखील निवड करू शकता.

यासोबतच या कारवर 5 हजार रुपयांचा कार एक्स्चेंज बेनिफिट, 5 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस, 9,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. Honda Jazz ची सुरुवातीची किंमत 7.65 रुपये आहे. टॉप मॉडल 9.89 लाख रुपयांपर्यंत जाते.

Advertisement

Honda WR-V: Honda WR V ही एक प्रीमियम कार आहे जी तिच्या डिझाइन आणि फीचर्ससाठी पसंत केली जाते. यामध्ये 10 हजार एक्सचेंज बेनिफिट, 5 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस, 9,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे. Honda WR V ची सुरुवातीची किंमत 7.65 लाख रुपये आहे, टॉप मॉडल 9.89 लाख रुपयांपर्यंत जाते.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker