Home Loan Tips : आता घराच्या रिपेअरिंगच्या नावावर देखील घेऊन शकता कर्ज; जाणून घ्या सविस्तर

MHLive24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही वर्षांत घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी गृहकर्ज अर्जदारांची संख्या वाढली आहे. गुंतवणुकीसाठी घरे घेण्याचा ट्रेंडही झपाट्याने वाढला आहे.(Home Loan Tips)

कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था ग्राहकाचे उत्पन्न आणि परतफेड क्षमता पाहून कर्ज देते. कर्ज पात्रता कॅल्क्युलेटर बहुतेक बँका किंवा NBFC च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. याद्वारे, ग्राहक कर्ज मिळवू शकतो की नाही हे शोधू शकतो.

घराचे स्वप्न केवळ घर बांधून किंवा घरे खरेदी करून पूर्ण होत नाही. घराची जीवापाड काळजी घ्यावी लागते. वेळोवेळी त्याची दुरुस्ती करावी लागते. रंग काढणे, तडे गेल्यास दुरुस्ती करणे, खोल्यांतील रचना बदलणे . अशा अनेक गोष्टींकडे बारकाईने बघावे लागते.

Advertisement

त्यातील काही कामे कदाचित आपल्याकडे असलेल्या पैशांपैकी काही रक्कम वापरून केली जाऊ शकतात. पण घराचे मोठे काम निघाले तर आपल्याकडचे पैसे अपुरे पडू शकतात. पण पुरेसे पैसे साठेपर्यंत घराचे काम रखडवण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी बँका होम इम्प्रूव्हमेंट लोन देतात.

गृह नूतनीकरणासाठी (रेनोवेशन ) कर्ज घेता येते. यावर टॅक्समध्ये सूट देखील देण्यात आली आहे. यासाठी बँक ग्राहकांना विशेष कर्ज देते. या कर्जामुळे ग्राहकांना बर्‍याच गोष्टी घरासाठी करता येतील.

प्राप्तिकर विभागाच्या नियमांनुसार या रकमेचा उपयोग घर रंगविण्यासाठी, नवीन मजला, खोली आणि बाल्कनी तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याच वेळी, बाथरूम आणि स्वयंपाकघरात फरशा बसविण्यासाठी कर्ज उपलब्ध आहे.

Advertisement

प्राप्तिकर नियमांनुसार होम इम्प्रूवमेंट लोनमध्ये जे काही समाविष्ट असेल त्यावर करात सूट मिळते. तथापि, काही खर्चास करात सवलत मिळत नाही. उदाहरणार्थ, घरात फायरप्लेस स्थापित करणे आणि स्विमिंग पूल बांधणे समाविष्ट आहे. मालमत्ता भाड्याने दिल्यास त्याच्या मेंटनेंससाठी एकूण भाडेपैकी 30 टक्के मिळू शकते.

होम इम्प्रूमेंट लोन नियमित खर्चाच्या दुरुस्तीसाठी नाही. प्राप्तिकर अधिनियम, 1961 च्या कलम 24 (बी) नुसार जर एखाद्याने कर्ज घेतले असेल तर वार्षिक व्याजपैकी 30 हजार रुपये कमी करता येईल. जर घर दोन लोकांच्या नावावर असेल तर आपण कर सूटचा फायदा घेऊ शकता. व्याजदरावर कर सवलतीच्या रक्कम 2 लाखांच्या एकूण मर्यादेत येईल.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker