तंत्रज्ञानाची कास धरा, कीर्तनातून पैसा येई घरा

MHLive24 टीम, 28 जुलै 2021 :- टाळेबंदीचा फटका बससेल्या कीर्तनावर अर्थाजन अवलंबून असलेल्या अनेक कीर्तनकारांनी या काळात बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरली अन्‌ ध्येय कायम ठेवत प्रवासाचा मार्ग बदलला. अनेकांनी कीर्तन ऑनलाईन केले, तर काहींनी उपजीविकेसाठी व्यवसाय सुरू करून कीर्तनाची कला जिवंत ठेवली.

कीर्तनाचे आॅनलाईन वर्ग :- गेल्या तीस वर्षांहून अधिककाळ कीर्तन करणारे ज्येष्ठ नारदीय कीर्तनकार वासुदेवबुवा बुरसे यांचे संपूर्ण कुटुंब हे कीर्तनावरच अवलंबून होते. टाळेबंदीची झळ त्यांनाही बसली; मात्र खचून न जाता त्यांनी ऑनलाइन कीर्तनाचे वर्ग घ्यायला सुरुवात केली.

त्याकरता आवश्यक ते नवीन तंत्रज्ञान समजावून घेतले आणि टाळेबंदीच्या काळातही पन्नासहून अधिक नवे कीर्तनकार तयार केले….ही केवळ एकाच कीर्तनकाराची कथा नाही, तर समस्त कीर्तनकारांची व्यथा आहे. बदलांचा अंगीकार करीत त्यातून कीर्तन जोपासण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

Advertisement

दरमहा उत्पन्न बंद :- पुणे जिल्ह्यात वारकरी आणि नारदीय कीर्तन शिकवणाऱ्या सुमारे 200 हून अधिक संस्था आहेत. यातील सर्वाधिक संस्था आळंदीत आहेत. तसेच 250 हून अधिक पूर्णवेळ कीर्तनकार असून त्यांचाही शिष्यवर्ग मोठा आहे. अनेक कीर्तनकार पूर्वी दरमहा सुमारे 20 ते 90 हजारांपर्यंत उत्पन्न मिळवत; मात्र टाळेबंदीमुळे ते बंद झाले. आरोग्यावर आलेले गंडांतर टाळण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असताना समाजाचे मानसिक आरोग्य जपणाऱ्या कीर्तनकार वर्गाकडे या कालावधीत समाजाचे दुर्लक्ष झाले.

कीर्तनकारांची सामाजिक सेवा :- श्रेयस बडवे हे युवा कीर्तनकार. त्यांच्या पत्नी आणि आई-वडीलही कीर्तनकार आहेत. टाळेबंदीच्या कालावधीत त्यांनी स्वतःचे यूट्युब चॅनल सुरू करून कीर्तन जोपासले. गायिका मंजुषा पाटील यांच्या काणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून कीर्तनात तबला पेटीची साथ देण्याऱ्या सहवादकांनाही मदत मिळवून दिली.

भोर तालुक्यातील उमेश शिंदे या युवा कीर्तनकाराने आणि त्याच्या साथीदारांनी स्वखर्चातून स्वतःची निवासी वारकरी शिक्षण संस्था सुरू केली. या गुरुकुलात कोरोना कालावधीत ज्यांच्या पालकांचे निधन झाले आहे, अशा विद्यार्थांना मोफत कीर्तन शिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांनादेखील अत्यल्प शुल्कात किंवा परिस्थितीनुसार मोफत वारकरी कीर्तन शिकवले जाते.

Advertisement

कीर्तनकार अर्थाजनासाठी वळले शेतीकडे :- आळंदीतील अविनाश महाराज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भक्तीशक्ती संघाची स्थापना केली. त्यातून पूर्णवेळ कीर्तनावर अवलंबून असलेल्या कीर्तनाकारांना अन्य व्यवसाय सुरू करून देण्यासाठी मदत केली. त्याद्वारे अनेक कीर्तनकारांनी स्वतःची भोजनालये, किराणा दुकाने, आईस्क्रीम पार्लर, वडापावची विक्री आदी व्यवसाय सुरू केले. ग्रामीण भागातील सुमारे ५० टक्के कीर्तनकार हे आता अर्थार्जनासाठी शेतीकडे वळले आहेत.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker