LIC IPO Update
LIC IPO Update

LIC IPO Update : सध्या LIC IPO बाबत आपण महत्वाची घडामोड घडत आहे. गुंतवणुकदार LIC IPO कडे लक्ष ठेवून आहेत. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) च्या IPO ची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.

LIC IPO बद्दल मोठी बातमी समोर आली आहे, त्यामुळे जर तुम्हाला देखील स्वारस्य असेल तर आमची बातमी नक्की वाचा. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आज मंगळवारी बाजारात उतरणार आहे.

20,557 कोटी रुपयांच्या IPO साठी सरकारला देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित सात खास गोष्टी.. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) च्या 20,557 कोटी रुपयांच्या IPO ला देशांतर्गत गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

सरकारने एलआयसीच्या शेअर्सची इश्यू किंमत 949 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. तर, LIC पॉलिसीधारक आणि किरकोळ गुंतवणूकदारांना अनुक्रमे रु. 889 आणि रु. 904 प्रति शेअर दराने शेअर्स मिळतील.

शेअर्स आज 17 मे रोजी BSE आणि NSE वर सूचीबद्ध केले जातील. LIC चा IPO 9 मे रोजी बंद झाला आणि त्याचे शेअर्स 12 मे रोजी बिडर्सना वाटप करण्यात आले.

मोदी सरकारने LIC IPO द्वारे LIC चे 22.13 कोटी पेक्षा जास्त शेअर्स म्हणजेच 3.5 टक्के शेअर्स ऑफर केले आहेत. यासाठी, किंमत श्रेणी 902-949 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होती.

देशांतर्गत गुंतवणूकदारांनी यात उत्साहाने भाग घेतला, ज्यामुळे एलआयसीचा आयपीओ जवळपास तीनपट सबस्क्राइब झाला.

तेही जेव्हा परदेशी गुंतवणूकदारांचा प्रतिसाद ‘कोल्ड’ होता. देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा IPO आहे. सरकारने या इश्यूद्वारे एलआयसीमधील आपला 3.5 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी, 2021 मध्ये आलेल्या पेटीएमचा आयपीओ 18,300 कोटी रुपयांचा होता. त्याआधी, 2010 मध्ये कोल इंडियाचा IPO सुमारे 15,500 कोटी रुपये होता.