पूरग्रस्तांना दोन दिवसांत मदत

MHLive24 टीम, 26 जुलै 2021 :- पूरग्रस्तांना मदत देताना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना दोन दिवसांत आढावा घेऊन मदत जाहीर करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

प्रत्येक जिल्ह्यांत एनडीआर टीम :- मागील काही वर्षांपासून येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला. प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर एनडीआरएफ टीम स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली. ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून येथील पूरस्थिती परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना त्यांनी दिलासा दिला.

मोठ्या प्रमाणात नुकसान :- चिपळूणमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. यामध्ये व्यापाऱ्यांचे तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या नुकसानीची पाहणी करण्याकरता ठाकरे चिपळूण दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर ,कराड, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी दरवर्षी पूर येत असतो.

Advertisement

या वर्षी चिपळूणात महापुराने हाहाकार माजवला आहे. या धर्तीवर स्थानिक पातळीवर होणारी एनडीआरएफ ही टीम खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सध्या असणाऱ्या टीममध्ये ही टीम अॅड होणार असून स्थानिक पातळीवर प्रत्येक जिल्ह्यात टीम तैनात होणार आहे.

व्यापारी आणि नागरिकांशी संवाद :- सकाळीच दौरा करत असताना व्यापारी आणि नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, की केंद्र सरकारने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी फोनवरून चौकशी केली आहे.

नुकसान झालेल्या प्रत्येक नागरिकाला तात्काळ भरपाई दिली जाणार आहे. कोल्हापूर सांगली आणि धोक्याच्या पातळीवर आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगलीत नुकसान झालेले आहे.

Advertisement

ठाकरे आज पश्चिम महाराष्ट्रात :- यासाठी उद्या पश्चिम महाराष्ट्रात जाऊन पाहणी करणार आहे. तात्काळ नागरिकांना गरजेच्या वस्तूची मदत केली जाणार आहे. पुरात सर्वच काही वाहून गेल्याने तातडीची मदत पोहोचण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker