file photo

Mhlive24 टीम, 24 ऑक्टोबर 2020 :- दिल्लीहून अलीपूर द्वारकडे जाणाऱ्या महानंदा एक्सप्रेसमधून एका तरुणीची छेड काढल्या कारणाने एकाला पोलिसांनी अटक केली.

परंतु पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जवळपास 58 लाखांची रोकड सापडली आहे. एवढी रक्कम पाहून पोलिसही चक्रावले.

रत्नेश कुमार असे या इसमाचे नाव आहे. अधिक माहिती अशी: दिल्लीहून अलीपूर द्वारकडे जाणाऱ्या महानंदा एक्सप्रेसमधून 58 लाखांची रोकड सोबत घेत रत्नेश कुमार प्रवास करत होता.

तो कटिहारला जात होता. एक्सप्रेस पाटणा जंक्शन स्थानकात थांबल्यावर रत्नेश कुमारने एसी कोचमध्ये बसलेल्या तरुणीची छेड काढली.

त्या तरुणीने एक व्यक्ती आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार मदत केंद्रावर फोनद्वारे केली. तरुणीच्या फोनची दखल घेत एक्सप्रेसमध्ये गस्त घालणारे आरपीएफचे जवान एसी कोचमध्ये दाखल झाले.

त्यांनी रत्नेश कुमारला ताब्यात घेतले. पुढील चौकशीसाठी त्याला बख्तियारपूर स्थानकात उतरवण्यात आले. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम तो नेत होता काय, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology