पत्नीला भेटायला आला अन्‌ पोलिसांच्या जाळ्यात अडकला

MHLive24 टीम, 31 जुलै 2021 :- सोनसाखळी चोरी केल्यानंतर फरारी झालेला सराईत गुन्हेगार पत्नीला भेटण्यासाठी आला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला. कोंढवा येथे हा प्रकार घडला आहे. आरोपीकडून १० गुन्हे उघडकीस आणून सात लाख सहा हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सापळा रचून इराणीला पकडले :- असद उर्फ असदुल्ला माशाअल्ला जाफरी उर्फ इराणी (वय ४७, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर) असे अटक केलेल्या सोनसाखळी चोराचे नाव आहे. शहरात वटपौणिमेच्या दिवशी महिलांची सोनसाखळी हिसकावून नेल्याच्या घटना घडला होत्या.

त्या इराणी याने केल्या होत्या. त्यानंतर इराणी फरारी झाला. दरम्यान, सोनसाखळी चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी गुन्हे शाखेकडून (युनिट ६) हद्दीत पेट्रोलिंग केले जात होते. त्या वेळी इराणी पत्नीला भेटण्यासाठी कोंढवा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार कानिफनाथ कारखेले आणि सचिन पवार यांना मिळाली.

Advertisement

त्यानुसार निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील यांच्या पथकाने सापळा रचून इराणीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदाराच्या मदतीने शहरात विविध भागांत सोनसाखळी चोरीचे नऊ गुन्हे केल्याचे उघडकीस आले. त्याशिवाय दुचाकीचोरीचाही एका गुन्हा उघडकीस आला.

यांनी बजावली कामगिरी :- ही कामगिरी निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, मच्छिंद्र वाळके, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, नितीन मुंढे, प्रतीक लाहिगुडे, हृषिकेश ताकवणे, हृषिकेश व्यवहारे, सचिन पवार, हृषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर यांनी केली.

सोने विकत घेणाऱ्या सराफाला अटक :- इराणी आणि त्याच्या साथीदारांनी चोरलेल्या सोनसाखळ्या ते कोंढवा येथील सराफ विशाल जगदीश सोनी (रा. कोंढवा) याला विकत असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे सोनी यालाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून १४ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker