कर्जाचे हप्ते भरण्यात अडचणी येत आहेत का? ‘ह्या’अधिकारांचा करा वापर, बँकेकडून होणार नाही त्रास

MHLive24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- बँकांशी निगडित विविध कामामध्ये बहुतेक लोकांना अडचणी येतात. ग्राहकांना बरेचदा आपल्या अधिकारांची संपूर्ण माहिती नसते. त्यामुळे या अडचणींपासून सुटका होण्यासाठी रिजर्व बँकेकडून तयार करण्यात आलेले बँकिंग कोड्स अँड स्टॅन्डर्ड्स बोर्ड ऑफ इंडिया (बीसीएसबीआई) ने बँक ग्राहकांना खूप सारे अधिकार दिले आहेत. त्याच प्रमाणे जर तुम्ही कर्ज घेतले असेल तरीही काही अधिकार तुम्हाला दिलेले आहेत. ते तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

१. ईएमआय न भरणे :- लागोपाठ ३ महिने म्हणजे ९० दिवसांचे ईएमआय न भरल्यास, बॅंकेला ग्राहकाला ६० दिवसांची नोटिस द्यावी लागते. जर ग्राहकाला दिलेली नोटीशीच्या कालावधीत ग्राहक आपल्या कर्जाची किंवा ईएमआयची परतफेड करण्यात अपयशी ठरला तर ग्राहकाच्या मालमत्तेची म्हणजेच ज्यासाठी कर्ज घेतले ते घर किंवा कार याची विक्री लिलाव केली जाऊ शकते. मात्र हे करण्याआधी बॅंकेला ग्राहकाला विक्रीच्या विवरणाचा उल्लेख करत आणखी एक ३० दिवसांची सार्वजनिक नोटिस द्यावी लागते.

२. बॅंकेने करायवयाची प्रक्रिया :- कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच ग्राहकाला हे माहित असले पाहिजे की मालमत्ता किंवा वाहनाची विक्री किंवा लिलाव करण्याआधी कर्जदाराला मालमत्तेच्या योग्य मूल्यांकनामध्ये सहभागी करत एक नोटिस द्यावी लागते. नोटिसमध्ये लिलावासाठी किंमत, तारीख आणि वेळेचा उल्लेख बॅंकेला करावा लागतो.

Advertisement

हे सर्व बॅंकेच्या मूल्यांकन करणाऱ्यांकडून केले जाते. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमची मालमत्ता किंवा वाहनाचे मूल्य बॅंकेने कमी केलेले आहे किंवा कमी दाखवलेले आहे (म्हणजेच मूळ किंमतीपेक्षा फारच कमी) तर तुम्हीदेखील लिलाव प्रक्रियेत भाग घेऊ शकता.

३. अतिरिक्त रक्कम ग्राहकाच्या खिशात :- कर्जाची परतफेड करता न येणारे किंवा ईएमआय न भरू शकणाऱ्या ग्राहकांना हेदेखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे की त्यांची मालमत्ता किंवा वाहन जरी बॅंकेने ताब्यात घेतले असले तरी तो ग्राहक लिलाव प्रक्रियेवर देखरेख करू शकतो. बॅंकेने लिलाव केल्यानंतर जर कर्जापेक्षा जास्त रक्कम बॅंकेच्या हाती आली असेल तर अतिरिक्त रक्कम बॅंकेला ग्राहकाला परत करावी लागते.

४. वसूली एजन्टांना घाबरू नका :- बॅंक वसूली एजन्ट नेमते. अर्थात ग्राहकांना हे माहित असले पाहिजे की या एजन्टांसाठी किंवा बॅंकेच्या वसूली विभागाला एक मर्यादा असते, ती त्यांना पार करता येत नाही. हे एजन्ट फक्त ग्राहकांच्या ऑफिस किंवा निवासस्थानी संपर्क करू शकतात. त्याचबरोबर या एजन्टांना सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत ग्राहकांना भेटण्याचा वेळ दिलेला असतो.

Advertisement

ते शिष्टाचार आणि इतर वर्तणुकीच्या नियमांचे उल्लंघन करू शकत नाहीत. ग्राहकाला हे माहीत असले पाहिजे की जर एखाद्या एजन्टाने त्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला घाबरवण्याचा किंवा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर अशा परिस्थितीत तुम्ही त्या प्रकाराची तक्रार बॅंकेकडे करू शकता. जर बॅंकेने दाद दिली नाही तर तुम्ही बॅंकिंग लोकपालकडे याची तक्रार करू शकता.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker