‘ही’ टाकाऊ वस्तू वापराल तर कधीच पांढरे होणार नाहीत केस

MHLive24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- केस गळती, कोंडा होणे आणि केस पांढरे होणे यामुळे कित्येक जण हैराण असतात. केसांना पुरेशा प्रमाणात पोषण न मिळाल्यामुळे केसांच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. घातक रसायने असलेले प्रोडक्टचा वापर करून केसांवर दुष्परिणाम होतात. वाढत्या वयाने केस पांढरे होणे ही सामान्य गोष्ट आहे.

परंतु, कमी वयात जर केस पांढरे होत असतील तर ही सर्वसामान्य बाब नक्कीच नाहीये. बर्‍याचदा योग्य पोषणाच्या कमतरतेमुळे आणि अनुवांशिक कारणांमुळे देखील केस पांढरे होऊ लागतात. परंतु जास्त ताण घेतल्यामुळे देखील केसांच्या या समस्येचे कारण ठरू शकते.

पांढर्‍या केसांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. यासाठी घरगुती उपचार म्हणून तुम्ही बटाट्याची मदत होऊ शकते. केसांसाठी पोषक असलेले घटक बटाट्याच्या सालीमध्ये आहेत. बटाट्याच्या सालीमुळे केसगळती रोखली जाऊ शकते आणि केस देखील नैसर्गिकरित्या काळे होतात. यामुळे बटाट्याची साल कचऱ्यामध्ये फेकण्याऐवजी त्यांचा केसांसाठी वापर करावा. जाणून घेऊया बटाट्याच्या सालीचा कसा करायचा वापर.

Advertisement

साहित्य 

आठ ते दहा बटाट्याच्या साली

दोन ते तीन कप पाणी

Advertisement

गुलाब पाणी

स्वच्छ सुती कापड

वाटी

Advertisement

असा करा वापर :- गॅसच्या मंद आचेवर एक पॅन ठेवा. पॅनमध्ये पाणी घेऊन ते तीन-पाच मिनिटांसाठी उकळत ठेवा. पाणी कोमट झाल्यानंतर पॅनमध्ये बटाट्याच्या साली टाका आणि पॅनवर झाकण ठेवा. बटाट्याच्या साली ३० ते ३५ मिनिटांपर्यंत उकळू द्या. यानंतर गॅस बंद करा आणि बटाट्याच्या साली १५ ते २० मिनिटांसाठी पाण्यामध्येच राहू द्या.

गाळणी किंवा स्वच्छ सुती कापड्याचा वापर करून पाणी एका वाटीमध्ये गाळून घ्या. या पाण्यामध्ये एक मोठा चमचा गुलाब पाणी मिक्स करा. हे पाणी थंड होऊ द्या. थोड्या वेळानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये हे पाणी भरून ठेवा आणि त्याचा वापर करा. सर्व प्रथम शॅम्पूनं आपले केस स्वच्छ धुऊन घ्या. यानंतर कंडिशनर लावा.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker