GST Council Meeting : जीएसटीच्या बैठकीनंतर अनेक गोष्टींच्या किमतीत बदल

MHLive24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :-  जीएसटी परिषदेची बैठक शुक्रवारी लखनऊमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीनंतर अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले.(GST Council Meeting  )

या निर्णयांचा थेट परिणाम सामान्य माणसावर होणार आहे. यामध्ये, कोरोनाव्हायरस रोखण्यासाठी औषधांवर जीएसटीमधून सूट वाढवून 31 डिसेंबर 2021 करण्यात आली.पण, पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यावर चर्चा झाली नाही.

या गोष्टींच्या जीएसटी दरात बदल

Advertisement

1. येत्या एक वर्षासाठी जहाज किंवा विमानाने निर्यात मालाच्या वाहतुकीवर जीएसटी आकारला जाणार नाही. कारण जीएसटी पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे निर्यातदारांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा परतावा मिळण्यात अडचण येत आहे.
2. रेल्वे भाग आणि लोकोमोटिव्हवर जीएसटी 12% वरून 18% पर्यंत वाढला.
3. त्याच वेळी, बायोडिझेलवरील जीएसटी 12% वरून 5% करण्यात आला.
4. अपंग व्यक्तींच्या वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रेट्रो-फिटमेंट किटवरील जीएसटी कमी करून 5%केला.
5. एकात्मिक बालविकास सेवा योजनेत वापरल्या जाणाऱ्या फोर्टिफाइड राईस कर्नल्सवरील जीएसटी दर 18% वरून 5% केला आहे.
6. फार्मा विभागाने शिफारस केलेल्या 7 औषधांवर जीएसटी दर 31 डिसेंबर 2021 पर्यंत 12% वरून 5% केला आहे.
7. केत्रुदा सारख्या कर्करोगावरील औषधांवर जीएसटी दर 12% वरून 5% केला आहे.
8. Zomato आणि Swiggy सारख्या अॅप्स वरून अन्न ऑर्डर करणे महाग झाले आहे. यासोबत आता आईस्क्रीम खाणे देखील महाग होईल. Swiggy आणि Zomato सारख्या ऑनलाईन अॅप्सवर 5%कर लागेल. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, डिलिव्हरी येथे केली जाईल तेथे कर कापला जाईल.

या औषधांवर 31 डिसेंबर 2021 पर्यंत इतका जीएसटी लागू होईल

1. रेमडेसिविर (5%)
2. हेपरिन (5%)
3. अॅम्फोटेरिसिन बी (0%)
4. Tocilizumab (0%)

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker