Share Market : जबरदस्त शेअर ! एक महिन्यात तिप्पट केले पैसे

MHLive24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- शेअर बाजारात चढ-उतार होत असतात. अनेक लोकांचा कल याकडे वाढला आहे. या मार्केटमध्ये कोणी गुंतवणूकदार रातोरात करोडपती होतो आणि कोणी कधी रस्त्यावरही येतो. हा उच्च जोखमीचा बाजार पुन्हा एकदा तेजीत आला आहे.(Share Market)

एक गोष्ट लक्षात ठेवा की शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी संयम हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही लगेच खरेदी-विक्री न करता शेअर्स तुमच्याकडे दीर्घकाळ ठेवण्याचा संयम बाळगला पाहिजे. शेअर मार्केटमध्ये अनेक शेअर्स आहेत ज्याने गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

तुम्हाला शेअर बाजारातून पैसे कमवायचे असतील तर काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल. पहिली गोष्ट म्हणजे संशोधन. तुम्ही ज्या कंपनीत गुंतवणूक करणार आहात त्या कंपनीचे सखोल संशोधन करा. सध्या शेअर बाजार तेजीत आहे.

Advertisement

शेअर बाजाराच्या या तेजीमुळे गुंतवणुकदारांना अभूतपूर्व पैसा कमावता आला आहे. त्यातही असे काही मल्टीबॅगर शेअर्स आहेत ज्यांनी फक्त काही दिवसात किंवा महिन्यात गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. मेफकॉम कॅपिटल मार्केट्स लि. या कंपनीच्या शेअरने तर फक्त दीडच महिन्यात गुंतवणुकदारांना मालामाल करून टाकले आहे.

एका महिन्यात पैसे झाले तिप्पट

मेफकॉम कॅपटिल मार्केट्स लि.च्या शेअरची किंमत सध्या ४४.१० रुपये आहे. मात्र २९ ऑक्टोबर २०२१ ला हा शेअर फक्त १३.१९ रुपये प्रति शेअर या किंमतीला उपलब्ध होता. त्यानंतर महिनाभरातच या शेअरने छप्परफाड कमाई करून दिली आहे.

Advertisement

या शेअरने गुंतवणुकदारांचा पैसा महिनाभरात तिप्पट केला आहे. महिनाभरात या शेअरने २३४ टक्के परतावा दिला आहे. या शेअरमधील तेजी सुरूच आहे. या शेअरमध्ये काही महिन्यांपूर्वी गुंतवणूक करणारे मालामाल झाले आहेत.

मेफकॉम कॅपटिल मार्केट्स लि. च्या शेअरमध्ये महिनाभरापूर्वी गुंतवलेल्या १ लाख रुपयाचे मूल्य आज जवळपास ३.३ लाख रुपये झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी १० जून २०२१ ला हा शेअर ६.८३ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करत होता.

म्हणजे ६ महिन्यात या शेअरने ५४६ टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. सहा महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे मूल्य आज ६.५ लाख रुपये झाले असते. मागील काही महिन्यात या शेअरने सातत्याने तेजी नोंदवली आहे. या कंपनीची स्थापना १९८५ मध्ये झाली होती.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker