Government schemes : सरकार नागरिकाना लाभ मिळावा यासाठी अनेक योजना आणत असते. या योजनाद्वारे सरकार सामान्य नागरीकांना विविध सुविधांचा लाभ देण्याचा प्रयत्न करते. या योजनांचा भरपूर प्रसार देखील झाला आहे.

अशातच केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. या योजनांद्वारे सरकार लोकांना आर्थिक आणि सामाजिक मदत करते.

तसेच सरकारने प्रधानमंत्री जन धन योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल लोकांसाठी जन धन खाते उघडले होते. त्याचप्रमाणे तुमचे बचत खाते जन धन योजनेशी लिंक केल्यास तुम्हाला अशा अनेक सुविधा मोफत मिळतील. याशिवाय या योजनेअंतर्गत ओव्हरड्राफ्टची सुविधाही उपलब्ध आहे. याबद्दल माहिती जाणून घ्या.

हे फायदे प्रधानमंत्री जन धन योजनेमध्ये उपलब्ध आहेत:
यामध्ये तुम्ही कोणतेही शुल्क न घेता फंड ट्रान्सफर करू शकता.
यामध्ये खातेदाराला एक लाख रुपयांचा अपघात विमाही मिळतो.
यामध्ये खातेदाराला मिनी स्टेटमेंट आणि मोबाईल बँकिंगची सुविधाही मोफत दिली जाते.
या योजनेअंतर्गत तुम्हाला 30,000 रुपयांपर्यंतचे लाइफ कव्हर मिळेल.
यामध्ये खातेदाराला सर्व गुंतवणुकीची माहिती दिली जाईल.
तुमच्या दोन सदस्यांना जन धन योजनेअंतर्गत शून्य शिल्लक खाते उघडण्याचा अधिकार आहे.