30 वर्षापेक्षा जास्त काम केलेल्या कर्मचार्‍यांना शासन देतेय 1 लाख रुपये?; जाणून घ्या सविस्तर…

Mhlive24 टीम, 25 फेब्रुवारी 2021:सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की 30 वर्षाहून अधिक काळ काम केलेल्या कर्मचाऱ्यांना  सरकार 1,20,000 रुपये देत आहे. व्हायरल झालेल्या वृत्तानुसार, एका संकेतस्थळाने असा दावा केला आहे की कामगार आणि रोजगार मंत्रालय 1990 ते 2021 पर्यंत काम केलेल्या कर्मचार्‍यांना 1.20 लाख रुपये देत आहे.

परंतु प्रत्यक्षात असे काहीही घडत नाही आणि ही बातमी बनावट आहे. भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे की ही बातमी बनावट आहे. म्हणून अशा बातम्यांपासून दूर रहा, नाहीतर आपणास मोठे नुकसान होऊ शकते.

बनावट वेबसाइटनुसार 1990 ते 2021 पर्यंत काम केलेल्या कर्मचार्‍यांना कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून 1,20,000 रुपये मिळविण्याचा अधिकार आहे. पैसे मिळविण्यासाठी आपण आपले नाव वेबसाइटवर तपासू शकता. 1.20 लाख रुपये काढण्यासाठी तीन सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या , असे काहीतरी विचारले जाते. परंतु हे सारे खोटे असल्याचे समोर आले आहे.

Advertisement

आपणही करू शकाल फॅक्ट चेक

आपल्यालाही असा मॅसेज मिळाल्यास आपण ते पीआयबीला https://factcheck.pib.gov.in/ वर किंवा व्हॉट्सअ‍ॅप नंबर +918799711259  किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर फॅक्ट चेक करण्यासाठी पाठवू शकता . ही माहिती पीआयबी वेबसाइट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker