Old Pension Scheme: खुशखबर ! सरकार जुनी पेन्शन योजना देण्याच्या विचारात; ‘ह्या’ सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा

MHLive24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- केंद्र सरकार त्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विचार करते आहे ज्यांच्या भरतीसाठीच्या जाहिराती 31 डिसेंबर 2003 रोजी किंवा त्याआधी देण्यात आल्या होत्या.(Old Pension Scheme)

कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, या मुद्द्यावर कायदा मंत्रालयाकडून मत मागवण्यात आले असून, त्यांच्यानंतर निर्णय घेतला जाईल.

डॉ जितेंद्र सिंह यांनी संसदेत सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारने हे प्रकरण कायदा मंत्रालयाच्या अखत्यारीत ठेवले होते. मात्र त्यांचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.

Advertisement

ते म्हणाले की, वित्तीय सेवा विभाग, निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभाग (DOP&PW) त्या कर्मचाऱ्यांना NPS च्या कक्षेतून वगळण्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकतात आणि त्यांना OPS अंतर्गत समाविष्ट करू शकतात. हे असे कर्मचारी असतील ज्यांच्या भरतीसाठी 01 जानेवारी 2004 रोजी किंवा त्यापूर्वी जाहिरात देण्यात आली होती.

पॅरामिलिटरी स्टाफला नव्या पेन्शन योजनेनुसार फायदे मिळणार

दुसरीकडे केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी काही दिवसाआधीच संसदेत वक्तव्य केले होते की सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्समध्ये होणाऱ्या नोकरभरतीला जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा कोणताही विचार नाही.

Advertisement

त्यांना विचारण्यात आले होते की 1 जानेवारी 2004 नंतर पॅरामिलिटरीमध्ये येणाऱ्या जवानांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे की नाही.

त्यांच्या म्हणण्यानुसार सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन रुल्स १९७२ अंतर्गत पॅरामिलिटरी स्टाफला पेन्शन आणि इतर फायदे मिळत आहेत. मात्र त्यांना नव्या पेन्शन योजनेतच काम करावे लागणार आहे.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker