MHLive24 टीम, 26 डिसेंबर 2021 :- इंटरनेट वापरणे आजच्या जीवनात एक सामान्य गोष्ट झाली आहे. वर्क फ्रॉम होम असेल किंवा ऑनलाईन शाळा असेल यामुळे सध्या इंटरनेटच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. याचा फायदा सर्वानाच दिसतो. पण ही फक्त एक बाजू आहे. दुसरा पैलू अधिक धोकादायक आहे, ज्याबद्दल आपल्याला माहित असले पाहिजे.(Alert)

गुगल तुमची हेरगिरी करत आहे!

द सनच्या रिपोर्टनुसार, फार कमी लोकांना माहित असेल की या इंटरनेटच्या मदतीने गुगल कंपनी तुमची हेरगिरी देखील करते. कधी आणि कुठे जाता? तुम्ही कोणाला ईमेल आणि मेसेज करता?

तुम्ही कोणती वेबसाइट आणि पोर्टल पाहता? इंटरनेटवर तुम्हाला कोणती माहिती मिळते. Google हे सर्व लक्षात घेते आणि नंतर आपल्या सहयोगी आणि इतर कंपन्यांसह डेटा शेअर करते.

पर्सनल डेटा लीक होण्याचा धोका

म्हणजेच तुमचा स्मार्टफोन ही सुविधाजनक गोष्ट आहे, पण तो तुमची वैयक्तिक माहिती कधी लीक करेल हे सांगता येणे मुश्किल आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला काही खात्रीशीर ट्रिक्स सांगणार आहोत जेणे करून तुमच्‍यासोबत अशा प्रकारची घटना कधीही घडू नये.

ज्याचा वापर करून तुम्ही Google ला तुमची हेरगिरी करण्यापासून रोखू शकता आणि तुमच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करू शकता. चला जाणून घेऊया काय आहे ट्रिक .

अशा प्रकारे Google चे ट्रॅकिंग थांबवा

तुम्ही तुमच्या मोबाईलचे गुगल सर्च इंजिन उघडा. तिथे डिस्कव्हर लिहिलेले दिसेल. पुढे त्याच्या जवळच  More असे लिहिलं जाईल. त्यावर क्लिक केल्यास myactivity.google.com असे लिहिले जाईल. तेथे तुम्हाला  Web & App Activity, Location History आणि YouTube History असे  3 पर्याय दिसतील.

टिक बॉक्स Off करा

या सर्व पर्यायांच्या खाली तुम्हाला प्रत्येकी एक टिक बॉक्स दिसेल. Google ने तुमचे लोकेशन आणि क्रियाकलाप ट्रॅक करू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्या टिक बॉक्सच्या बाजूला असलेल्या बंद बटणावर क्लिक करू शकता.

यानंतर गुगलला गुगल, यूट्यूबचा सर्च हिस्ट्री आणि लोकेशनची माहिती कळू शकणार नाही. जर तुम्ही असे केले नाही, तर Google या गोष्टी आपोआप सेव्ह करत राहते आणि कोणीही थोडी ट्रिक अवलंबून ही माहिती मिळवू शकते.

Google Chrome देखील कंट्रोल करा

तुम्ही Google Chrome आणि Google Play वर तुमची एक्टिविटी देखील कंट्रोल करू शकता. आपण या दोन्हीवरील आपल्या मागील सर्चिंग हिस्ट्री हटवू शकता. यासोबतच, तुम्ही काही गोष्टींसाठी गुगलला ‘ट्रॅकिंग परमिशन’ आणि ‘नो की’ हे पर्याय देखील निवडू शकता.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup