खुशखबर! तुम्ही ट्विटरकडून मिळवू शकता हजारो डॉलर्स; फक्त करावे लागेल ‘हे’ काम

MHLive24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. आज ट्विटर कुणाला माहिती नाही असे होणार नाही. आता ट्विटर कडून कमाईची संधी मिळाली आहे.

मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी आणि त्यात कोणतेही दोष शोधण्यासाठी बग बाउंटी स्पर्धा सुरू केली आहे, ज्यामध्ये कंपनीकडून जास्तीत जास्त $ 3,500 (अंदाजे 2,60,327 रुपये) बक्षीस दिले जाईल. या स्पर्धेचा मुख्य उद्देश सुरक्षा संशोधकांद्वारे ट्विटरच्या अल्गोरिदममध्ये काही त्रुटी शोधणे आहे.

ट्विटरमधील सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे संचालक रुम्मन चौधरी म्हणाले की, मे महिन्यात आम्ही आमची अल्गोरिदम (ज्याला आमची इमेज क्रॉपिंग अल्गोरिदम असेही म्हटले जाते) सार्वजनिक केले जेणेकरून कोणतीही त्रुटी ओळखता येईल आणि आम्ही आमचे काम पुढच्या स्तरावर नेले.

Advertisement

इतरांसाठी कोड उपलब्ध करून दिला. चौधरी म्हणाले, “या अल्गोरिदमचे संभाव्य तोटे ओळखण्यासाठी कम्यूनिटीला आमंत्रित करून आणि प्रोत्साहित करून आम्ही हे काम एक पाऊल पुढे टाकू इच्छितो.”

बग बाउंटी स्पर्धेच्या विजेत्याला ‘इतके’ बक्षीस मिळेल :- या स्पर्धेचा मुख्य हेतू त्रास कमी करणे आहे. ट्विटरने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपण ट्विटर वापरकर्त्यांपासून ग्राहकांपर्यंत किंवा स्वतः ट्विटरवर कोणालाही होणारे नुकसान समोर आणावे अशी आमची इच्छा आहे. या बग बाऊंटी स्पर्धेतील विजेत्यांची नावे 8 ऑगस्ट रोजी ट्विटरद्वारे आयोजित कार्यशाळेत देण्यात येतील. विजेत्या संघाला HackerOne कडून रोख बक्षीस दिले जाईल जे खालीलप्रमाणे असेल…

  • पहिल्या विजेत्याला $ 3,500
  • दुसऱ्या विजेत्याला $ 1,000
  • तिसऱ्या विजेत्याला $ 500
  • मोस्ट इनोवेटिव विजेत्याला $ 1,000
  • मोस्ट जनरलाइजसाठी $ 1,000

कधी पर्यंत भाग घेऊ शकता ? :- यात सहभागी होणारे 6 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 11:59 पर्यंत सहभागी होऊ शकतात.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker