Mhlive24 टीम, 21 ऑक्टोबर 2020 :- रिलायन्स जिओने यासाठी अमेरिकन टेक्नॉलॉजी फर्म क्वालकॉमबरोबर भारतात 5G नेटवर्कचे यशस्वी चाचणी केली आहे.

अमेरिकेच्या सॅन डियागोमध्ये 20 ऑक्टोबर रोजी झालेल्या एका व्हर्च्यूअल इव्हेंटमध्ये दोन्ही कंपन्यांनी याची घोषणा केली. त्यामुळे भारतात लवकरच 5G नेटवर्क मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या जगभरात अमेरिका, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि स्वित्झर्लंड मध्ये 5G नेटवर्क उपलब्ध असून या ठिकाणी ग्राहकांना इंटरनेटचा 1Gbps पर्यंत स्पीड मिळत आहे.

भारतात ही टेक्नॉलॉजी आल्यानंतर ग्राहकांना 5G नेटवर्कचा अनुभव घेता येणार आहे. क्वालकॉम ही जगातील वायरलेस क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. त्यामुळे सध्या रिलायन्सबरोबर ती यासाठी काम करत आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी या गुंतवणुकीविषयी असे म्हटले होते की, जिओ क्वालकॉम बरोबर 5G नेटवर्कवर काम करत असून लवकरच भारतात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे.

त्याचबरोबर कंपनी भारतातील 5G टेक्नॉलॉजी सोल्यूशनवर देखील काम करत असून याचा वापर रिटेल आणि इंड्रस्टीसाठी करण्यात येणार आहे.

 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology