खुसखबर ! सोन्याच्या दरात विक्रमी घसरण, ‘हे’ आहेत दर

Mhlive24 टीम, 28 सप्टेंबर 2020 :-सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सोन्या – चांदीच्या दराने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. 

अगदी गगनाला जाऊन हे भाव भिडले होते. परंतु मंगळवार पाठोपाठ बुधवारीही या दरामध्ये प्रचंड घसरण झाली आहे. अधिकमासात सोन्यात घसरण होत असल्याचे उलट चित्र प्रथमच पाहायला मिळाले आहे.

गेल्या एक महिन्यापासून सोन्याचांदीच्या दरात घसरण सुरू आहे. या एका महिन्यात तब्बल १२०० रुपयांची घसरण दिसून आली. सोन्याचा आजचा भाव प्रतितोळे ५० हजार ३०० रुपये आहे. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 485 रुपयांनी घसरून ५०,४१८ रुपयांवर आला. 

Advertisement

आता पुढच्या एका महिन्यात सोन्याच्या दरावर आणखी दबाव येणार असून तो घसरुन ४७,००० पर्यंत जाऊ शकतो. पण दर जास्त काळ कमी राहणार नाहीत. ३ महिन्यांतील सोन्याच्या दरांमधली वाढ पाहता सोनं पुन्हा एकदा महाग होऊ शकतं. 

आठवड्याच्या शेवटी अर्थात शुक्रवारी सोनं १२५ रुपये प्रति १० ग्राम आणि चांदीचा भाव १२५० रुपये प्रति किलोग्रॅम पाहायला मिळाला. सध्याच्या व्यापारात सोनं सर्वाधिक ५०,७५० च्या खाली ५०,६०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि 

चांदी वर ५८,००० आणि खाली ५७,८००० रुपये प्रति किलो ग्रॅम विकली गेली. सोना ५० ६५० रुपये प्रति १० ग्रॅम, चांदी ५७, ९०० रुपये प्रति किलोग्रॅम आणि चांदीची नाणी ७२५ रुपये प्रति नग राहीली. 

Advertisement

काय म्हणतात तज्ज्ञ :- कमोडिटी अँड करन्सी सेगमेंटचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या मते सोन्याचा दर काही काळासाठी कमी होऊ शकतो. दिवाळीच्या आसपास सोन्याच्या किंमती पुन्हा वाढतील.

मागणी वाढल्यानंतर सोने पुन्हा 52000 रुपयांच्या जवळपास जाईल. डिसेंबरच्या अखेरीस, सोन्याचे दर  56000 पर्यंत जावू शकते. आता सोन्याचे दर ४७००० -४८०००  रुपयांवर येण्याची शक्यता आहे.

दिवाळीला येऊ शकते तेजी :- यावर्षी दिवाळी आणि धनत्रयोदशीला सोन्याची किंमत पुन्हा वाढेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार 10 ग्रॅम सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 60000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

Advertisement

त्याच वेळी, चांदीची किंमत 80 हजारांवर जाऊ शकते.  त्यांच्या मते, सध्या सोन्याच्या किंमती अल्पावधीतच घसरताना दिसतील, परंतु या वर्षाच्या अखेरीस सोन्याला वेग येईल आणि या दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतील.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker