खुशखबर! मोदी सरकार आता तुमच्या घराचाही 3 लाखांचा विमा उतरवणार; वाचा सविस्तर…

MHLive24 टीम, 29 जुलै 2021 :-  मोदी सरकार अनेक योजना राबवत असते. जनसामान्यांच्या कल्याणासाठी मोदीसरकारने अनेक कल्याणकारी योज राबविल्या. आता मोदी सरकार पुन्हा मोठी योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना , पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आदी सोशल स्किम केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत.

आता नैसर्गिक आपत्तीमुळे घरांच्या होणाऱ्या नुकसानीला विमा सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकार योजना आणण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकार गृह विमा योजना जाहीर करू शकते, असे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी केंद्र सरकारमार्फत तीन लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. 3 लाख रुपयांचे हे विमा संरक्षण घरगुती वस्तूंच्या भरपाईसाठी आहे. याखेरीज दोन कुटुंबातील सदस्यांना 3 लाख रुपये मिळतील.

Advertisement

वैयक्तिक अपघात कव्हर पॉलिसी घेणार्‍या सदस्यांना ही रक्कम दिली जाणार आहे. केंद्र सरकारची ही योजना सर्वसाधारण विमा कंपन्यांमार्फत उपलब्ध करून दिली जाईल आणि त्याचे प्रीमियम लोकांच्या बँक खात्यात जोडले जातील.

केंद्र सरकार ही योजना जनरल इंश्युरन्स कंपन्यांच्यामाध्यमातून राबवू शकते. त्याचा प्रीमियम लोकांच्या बँक अकाऊंटशी लिंक असेल. होम इंश्युरन्स स्किमसाठी साधारण 500 रुपये वार्षिक प्रीमियम असू शकतो. भूकंप, मुसळधार पाऊस, महापूर, भूस्खलन इत्यांदीमुळे घरांच्या होणाऱ्या नुकासानीला विमा सुरक्षा देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने 2015 मध्येच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत वयाच्या 55 वर्षापर्यंत कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबातील नामनिर्देशित व्यक्तीला सरकारकडून 2 लाख रुपयांचा जीवन विमा देण्यात येईल. याशिवाय सरकारने अपघात विमा योजना म्हणून सुरू केलेली प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना देखील सुरू केली आहे.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker