खुशखबर! दहावी पास असणाऱ्यांना रेल्वेत नोकरीची संधी; परीक्षा नाही थेट भरती, वाचा डिटेल्स

MHLive24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- उत्तर मध्य रेल्वेने 1000 हून अधिक प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 1664 पदांची भरती केली जाईल. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 02 ऑगस्टपासून सुरू होईल. इच्छुक उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 01 सप्टेंबरपर्यंत सुरू राहील.
पद संख्या- 1664

पात्रता :- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून 8 वी / 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. या व्यतिरिक्त, उमेदवारांकडे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वय :- अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

Advertisement

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू करण्याची तारीख – 02 ऑगस्ट
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 सप्टेंबर

निवड प्रक्रिया :- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची गुणवत्ता यादीच्या आधारे निवड केली जाईल. यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही.

अर्ज फी

Advertisement
  • सामान्य/ओबीसी- 100 रु
  • SC/ST/Pwd- फी नाही

याप्रमाणे अर्ज करा :- इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी 02 ऑगस्ट ते 01 सप्टेंबर पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पहा.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker