खुशखबर! आगामी सणासुदीच्या दिवसांत मोदी सरकार सर्वसामान्यांसाठी आणणार ‘हे’ आर्थिक पॅकेज

Mhlive24 टीम, 28 सप्टेंबर 2020 :-  आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये ग्राहकांच्या हाती पैसे पोहोच करण्यासाठी केंद्र सरकार आणखी एक आर्थिक पॅकेज जाहीर करू शकते. पुढच्या महिन्यापासून भारतात सणासुदीचा हंगाम सुरू होत आहे. हा देशातील सर्वात मोठा खरेदीचा हंगाम मानला जातो.

दिवाळीपर्यंत अर्थव्यवस्थेत पुनर्प्राप्तीसाठी प्रयत्न करणे हे मोदी सरकारच्या या मदत पॅकेजचे उद्दीष्ट असू शकते. या मदत पॅकेजच्या मदतीने नोकरी-व्यवसाय करणारे, स्थलांतरित मजूर आणि कमाईमध्ये नुकसान झालेल्या छोट्या-छोट्या व्यवसायिकांपर्यंत पैसे पाठविण्याचा उद्देश या पाठीमागे असणार आहे.

अनेक तज्ञांनी मदत पॅकेज जाहीर करण्याची आशा व्यक्त केली आहे. यापूर्वीही केंद्र सरकार दिवाळीच्या आसपास आर्थिक पॅकेजेस जाहीर करत आली आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये दिवाळीच्या आधी सरकारने 27 उत्पादनांवरील जीएसटी दर कमी केले. त्यात बहुतेक ग्राहक उत्पादने होती. त्याबरोबरच इतर इन्सेंटिव्हही जाहीर करण्यात आले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सणाच्या हंगामात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कॉर्पोरेट कराचे दर कमी केले होते. यामुळे देशातील कंपन्यांचा सुमारे 1.45 लाख कोटींचा नफा झाल्याचा अंदाज वर्तविला जात होता.

Advertisement

रेटिंग एजन्सी फिच रेटिंग्जने अलीकडेच असा अंदाज वर्तविला आहे की सरकार भारताच्या अर्थव्यवस्थेला मदत करण्यासाठी आणखी एक मदत पॅकेज जाहीर करू शकते. या महिन्याच्या सुरूवातीला एफआयसीसीआयने (फिक्की ) आणखी एका आर्थिक पॅकेजची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.

एफआयसीसीआयने (फिक्की ) म्हटले होते की पहिल्या तिमाहीत देशाच्या जीडीपीतील घट हे स्पष्टपणे सूचित करते की अर्थव्यवस्थेतील मागणीला बळकटी देण्यासाठी एका मोठ्या मदत पॅकेजची आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे महिन्यात कोरोना लॉकडाऊन दरम्यान सुमारे 20 लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. या मदत पॅकेजमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजना जाहीर करण्यात आली. त्याअंतर्गत गरीब, महिला, शेतकरी व ज्येष्ठ नागरिकांना 1.70 लाख कोटी रुपयांचे मोफत अन्नधान्य आणि रोख लाभ देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

 

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker