आयटीआर भरणाऱ्यांना स्टेट बँकेकडून खुशखबर; मिळतेय ‘ही’ जबरदस्त सुविधा

MHLive24 टीम, 25 जुलै 2021 :- इन्कम टॅक्स विभागानं इन्मक टॅक्स दिनानिमित्त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आपल्या ग्राहकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना Yono App वर Tax2Win द्वारे आपला इन्कम टॅक्स रिटर्न मोफत भरता येणार आहे. याशिवाय जर इन्मक टॅक्स रिटर्न करताना जर सीएची मदत लागली तर त्यासाठी केवळ १९९ रूपये आकारले जाणार आहेत.

Tax2win करदात्यांसाठी ई-फायलिंग प्लॅटफॉर्म आहे. त्याच्या मदतीने कर विवरण भरणे खूप सोपे आहे. तसेच ही रिटर्न भरण्याची सेवा देखील विनामूल्य आहे. एसबीआयने टॅक्स टू विनशी करार केला असून, ही सुविधा बँकेच्या योनो अ‍ॅपवरही देण्यात आलीय. आपण एसबीआय योनो वापरत असल्यास प्रथम मोबाईल पिनसह त्यामध्ये लॉगिन करा.

आपल्याला शॉप अँड ऑर्डरच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि आपल्यासमोर एक नवीन पेज उघडेल. येथे आपल्याला व्यू ऑल ऑन द टॉप कॅटेगरीज पर्यायावर क्लिक करावे लागेल. कर आणि गुंतवणुकीचा पर्याय पेजच्या तळाशी देण्यात आलाय.

Advertisement

तिथे क्लिक केल्यावर Tax2win चा पर्याय दिसेल. तेथे क्लिक केल्याने आपल्याला एका नवीन पेजवर घेऊन जाईल. येथे आयटीआर फाईल नाऊचा पर्याय आहे. येथे स्वतः फाईल करा आणि वैयक्तिक ईसीए मिळवा.

स्टेट बँकेनं Tax2win सोबत केलेल्या करारामुळे या सुविधेचा ग्राहकांना लाभ घेता येत आहे. पाहा याचा कसा तुम्ही वापर करू शकता.

  • सर्वप्रथम SBI YONO अॅपवर क्लिक करा. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या Shop and Order या पर्यायावर क्लिक करा.
  • या पर्यायवर क्लिक केल्यानंतर एक नवं पान सुरू होई. त्याठिकाणी view all या ऑप्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला Tax And Investment हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर Tax2Win हा ऑप्शन दिसेल.
  • Tax2Win वर क्लिक केल्यानंतर एक नवं पेज ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला आयटीआर आणि सीएचा ऑप्शन दिसेल. या ठिकाणी तुम्ही सीएचा ऑप्शन निवडून या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

२०२० मध्ये इन्कम टॅक्स विभागानं इन्कम टॅक्स दिवसाची सुरूवात केली होतीय यामागे एक विशेष कारणही होतं. तेव्हा इन्कम टॅक्स विभागाला १५० वर्षे पूर्ण झाली होती. १८६० मध्ये ब्रिटीशांनी याची सुरूवात केली होती.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker