Good news for pensioners : पेन्शनधारकांसाठी खुशखबर ! तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी

MHLive24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- पेन्शनधारकांसाठी अत्यंत कामाची हि बातमी आहे. कारण त्यांना वारंवार करावे लागणारे आणि कार्यालयाच्या चकरा मारायला लावणारे काम बंद होणार आहे. सध्या पेन्शनधारकांना पेन्शन सुरू ठेवण्यासाठी त्यांच्या बँकेत दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते.(Good news for pensioners)

जीवन प्रमाणपत्र हा त्यांच्या हयातीचा पुरावा असतो, जो दरवर्षी बँक, पोस्ट ऑफिस किंवा वित्तीय संस्थेकडे जमा करावा लागतो. जेणेकरून पेन्शनधारकांची पेन्शन सुरू राहू शकेल.

आता घरबसल्याही जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार असल्याची सुविधा बँका आणि पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.

Advertisement

आता जीवन प्रमाणपत्र कधीही सादर केले जाऊ शकते

EPFO ने आता जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या नियमात मोठा दिलासा दिला आहे. कारण सद्य स्थितीला हा पुरावा दाखल करण्याचा एक अंतिम मुदत असते. परंतु आता नवीन नियमांनुसार, पेन्शनधारक आता त्यांच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार कधीही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.

याशिवाय, त्याची वैधता जीवन प्रमाणपत्र सादर केल्याच्या तारखेपासून पुढील एक वर्षासाठी वैध असेल. उदाहरणार्थ, समजा तुम्ही तुमचे जीवन प्रमाणपत्र 1 डिसेंबर 2021 रोजी सबमिट केले असेल तर त्याची वैधता 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत असेल.

Advertisement

जीवन प्रमाण पोर्टलद्वारे प्रमाणपत्र तयार केले जाऊ शकते

केंद्र सरकारच्या जीवन प्रमाण पोर्टलद्वारे तुम्ही डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र तयार करू शकता. जीवन प्रमाण वेबसाइट https://jeevanpramaan.gov.in/ ला भेट देऊन आधार आधारित प्रमाणीकरणाद्वारे डिजिटल प्रमाणपत्र तयार केले जाऊ शकते.

सरकारी बँका किंवा पोस्ट ऑफिसच्या डोअरस्टेप बँकिंग सेवेद्वारे तुम्ही डिजिटल जीवन प्रमाणपत्र बुक करू शकता. पोस्टमन किंवा एजंटच्या घरी येण्यापूर्वी आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, पेन्शन क्रमांक, पेन्शन खाते यासारखे तपशील तयार ठेवावे लागतील.

Advertisement

याप्रमाणे जीवन प्रमाणपत्र सादर करता येईल

पेन्शनधारक सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांच्या डोअरस्टेप बँकिंग सेवेचा वापर करून इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) अंतर्गत डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.

या बँकांमध्ये इंडियन बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), बँक ऑफ बडोदा (बीओबी), बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया आदींचा समावेश आहे.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker