नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांसाठी खुशखबर ! ‘ही’ कंपनी देणार 1 लाख लोकांना नोकर्‍या

MHLive24 टीम, 30 जुलै 2021 :- सध्या कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक लोक बेकार झाले. अनेक सुशिक्षित आधीपासूनच नोकरीच्या शोधात होते. आता तर ते आणखीनच वेटिंग लिस्टवर पडले आहेत. परंतु आता नोकरी शोधणाऱ्या लोकांसाठी खुशखबर आहे. एक लाख लोकांना नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. चला जाणून घेऊयात याविषयी सविस्तर…

दिग्गज आयटी कंपनी कॉग्निझंट यंदा एक लाख लोकांना नोकऱ्या देणार आहे. जूनच्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 41.8 टक्क्यांनी वाढून 51.2 कोटी अमेरिकन डॉलर एवढे (अंदाजे 3,801.7 कोटी) झाले आहे. कंपनीने बुधवारी याबाबत माहिती दिली आहे.

जून 2020 च्या तिमाहीत अमेरिकेतील कंपनीचे एकूण उत्पन्न 36.1 कोटी डॉलर होते. कॉग्निझंटने आर्थिक वर्ष 2021 साठीच्या कमाईच्या वाढीचे लक्ष्य 10.2-11.2 टक्क्यांपर्यंत वाढवले. मागील तिमाहीत कंपनीचा महसूल 14.6 टक्क्यांनी वाढून 4.6 अब्ज डॉलर झाला, जो मागील वर्षातील याच कालावधीत 4 अब्ज अमेरिकन डॉलर्स होता.

Advertisement

कंपनीच्या अंदाजापेक्षा हा आकडा जास्त आहे. कॉग्निझंट सीईओ ब्रायन हम्फ्रीजच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये आम्ही जवळपास 1 लाख भरती आणि जवळपास 1 लाख सहकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी करतोय. याशिवाय कॉग्निझंट 2021 मध्ये सुमारे 30,000 नवीन पदवीधर आणि 2022 साठी भारतातील नवीन पदवीधरांना 45,000 ऑफर देण्याची अपेक्षा करतो.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker