खुशखबर! उपलब्ध असलेल कोरोनाचं ‘हे’ औषध झालं स्वस्त; किंमत फक्त …

MhLive24 टीम , 25 जुलै  2020 :-भारतात कोरोनाची भीती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अनेक देश कोरोनावर लस शोधण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या जपानच्या औषध कंपनीने तयार केलेलं फेविपिरावीर हे औषध वापरले जात आहे. हे औषध भारतातही तयार होऊ लागलं.

भारतातील काही औषध कंपन्यांनी वेगवेगळ्या नावाने हे औषध तयार केलं आहे आणि भारतीयांसाठी स्वस्त किंमतीत उपलब्ध करून दिलं आहे. आता हे औषध इतकं स्वस्त झालं की एक टॅबलेट फक्त 39 रुपयात उपलब्ध होणार आहे.

याआधी ब्रिन्टॉन औषध कंपनीने फेविटॉन म्हणून हे औषध लाँच केलं आहे. ज्याची किंमत प्रति टॅबलेट 59 रुपये आहे. तर ग्लेनमार्क कंपनीने फॅबिफ्लू म्हणून हे औषध विकत आहे.

Advertisement

ज्याची किंमत प्रति टॅबलेट 75 रुपये आहे. परंतु आता जेनबर्ट फार्मास्युटिकल कंपनीने फेविवेंट या नावाने फेविपिरावीरचं औषध लाँच केलं आहे. या औषधाच्या एका टॅबलेटची किंमत फक्त 39 रुपये आहे. एका पाकिटात 10 टॅबलेट असतील, असं कंपनीने सांगितलं आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com वर

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker