सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ‘ह्या’ बँकेत मोठी भरती, जाणून घ्या डिटेल्स

MHLive24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- IDBI बँक लिमिटेड ने सुमारे 900 एग्जीक्यूटिव पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 04 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे एकूण 920 पदांची भरती केली जाईल. अर्ज प्रक्रिया 18 ऑगस्टपर्यंत सुरू राहील.

पद संख्या – 920

पात्रता :- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून 55% गुणांसह पदवी असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी, अधिकृत अधिसूचना पहा.

Advertisement

वय मर्यादा :- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू तारीख – 04 ऑगस्ट
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट

निवड प्रक्रिया :- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ऑनलाईन चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्रांच्या पडताळणीच्या आधारे केली जाईल.

Advertisement

पगार :-  निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 29,000 ते 34,000 रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.

अर्ज फी

  • सामान्य/ओबीसी- 1000 रुपये
  • SC/ST/Pwd- 200 रु

अर्ज कसा करावा :- इच्छुक आणि पात्र उमेदवार 18 ऑगस्टपर्यंत या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पहा.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker