बारावी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी! पगार 90 हजारांपर्यंत

MHLive24 टीम, 28 जुलै 2021 :- ऑइल इंडिया लिमिटेडने विविध कनिष्ठ सहाय्यक पदांच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेच्या माध्यमातून एकूण 120 पदे भरती केली जातील.

या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी अधिकृत संकेतस्थळ oil-india.com  वर अर्ज करू शकतात.

पद संख्या- 120

Advertisement
  • कॅटेगिरी पद संख्या
  • जनरल 54
  • एससी 8
  • एसटी 14
  • ओबीसी 32
  • ईडब्ल्यूएस 12

योग्यता :- अर्जदारांनी शासकीय मान्यताप्राप्त मंडळाकडून 40 टक्के गुणांसह 10 + 2 उत्तीर्ण केले पाहिजे. यासह उमेदवारांनी कंप्यूटर एप्लीकेशन किमान 06 महिने डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. एमएस वर्ड, एमएस एक्सेल, एमएस पॉवरपॉईंट इत्यादींचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.

वयोमर्यादा :- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षे असावे. तथापि, एससी-एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे आणि ओबीसी (नॉन-क्रीमी लेयर) साठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे आहे.

महत्त्वाच्या तारखा

Advertisement
  • अर्ज करण्याची प्रारंभ तारीख – 1 जुलै
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख – 15 ऑगस्ट

सिलेक्शन प्रोसेस :- या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (सीबीटी) च्या आधारे केली जाईल.

पगार :- या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ग्रेड 3 अंतर्गत 26,600 रुपयांपासून ते 90,000 रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल.

असा करा अर्ज :-  इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑल इंडियाच्या अधिकृत वेबसाइट oil-india.com   वर 15 ऑगस्टपर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी आपण अधिकृत सूचना पाहू शकता.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker