Gold Price : भारतीय लोकामध्ये सोन्याबद्दल प्रचंड क्रेझ आहे. बरं ही क्रेझ फक्त पेहराव म्हणून नाही तर एक गुंतवणूक म्हणूनही चांगली उदयास येत आहे.

कोणताही सण असो की लग्नाचा मुहूर्त, भारतात सोनेखरेदी जोरात असते. दरम्यान आता लोक प्रत्यक्ष सोने करण्याबरोबरच आता डिजिटल सोन्यात गुंतवणूक करत आहेत.

वास्तविक आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोने हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. या वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याने गुंतवणूकदारांना 7 टक्के परतावा दिला आहे.

तथापि, त्याच्या किमतींमध्ये अनेक वेळा तीव्र चढ-उतार झाले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जागतिक चलनवाढ आणि वाढत्या व्याजदरांमध्ये सोने गुंतवणूकदारांसाठी आणखी फायदेशीर ठरू शकते. पाच कारणांमुळे त्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

वाढती महागाई जिथे भारतातील किरकोळ महागाई 14 टक्क्यांच्या पुढे गेली आहे. त्याच वेळी, ब्रिटन आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये ते चार दशकांच्या उच्चांकावर आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अल्पकालीन चढउतार वगळता सोन्याच्या किमती वाढत्या महागाईच्या काळात कमी होण्याऐवजी तेजीचा कल पहायला मिळतात.

कारण महागाईचा सामना करण्यासाठी सोने हा उत्तम गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. अशा स्थितीत आगामी काळात सोन्याच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.

व्याजदर वाढ रिझर्व्ह बँकेने नुकतीच रेपो दरात 0.40 टक्के वाढ केली तर यूएस फेडने रेपो दरात 0.50 टक्के वाढ केली. याशिवाय ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्यवर्ती बँकांनीही व्याजदरात वाढ केली आहे.

महागाई रोखण्यासाठी व्याजदरात ही वाढ करण्यात आली आहे. व्याजदर वाढल्याने कर्जे महाग होत आहेत, त्यामुळे उद्योगाबरोबरच सर्वसामान्य माणूसही कर्ज घेणे आणि व्यवसाय वाढवणे टाळतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

त्यामुळे आर्थिक विकासाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. या स्थितीतही सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

मजबूत डॉलर सोन्याची जागतिक किंमत डॉलरमध्ये ठरवली जाते. कच्च्या तेलाच्या चढत्या किमती आणि वाढत्या व्याजदरामुळे गुंतवणूकदार भारतासारख्या विकसनशील देशातून भांडवल काढून अमेरिकेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत.

यामुळे डॉलरची मागणी वाढली असून, त्यामुळे त्याच्या किंमतीही वाढल्या आहेत. अशा स्थितीत डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ होण्यास वाव आहे.

जगाच्या पुरवठा साखळीत व्यत्यय चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या केसमुळे अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन आहे. यामुळे जगभरातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.

वाहन उद्योग ते ग्राहकोपयोगी वस्तूंसह अनेक क्षेत्रांवर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर आर्थिक मंदीची भीती पुन्हा बळावली आहे. या स्थितीतही सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

रशिया-युक्रेनमध्ये प्रदीर्घ युद्ध जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेचे प्रमुख कारण म्हणजे रशिया आणि युक्रेनमधील युद्ध.

जर ते अधिक काळ खेचले तर जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम दिसून येईल. या संकटाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरातही वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे