Gas prices increases : महागाईचा पुन्हा झटका! गॅसच्या किमती तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या

MHLive24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आता आज नवीन महिन्याच्या अर्थात डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा जनतेला महागाईचा जबर फटका बसला आहे.(Gas prices increases)

पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून गॅसच्या दरात वाढ केली असून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

दिलासा देणारी बाब म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्ये झाली असून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र, व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्यानंतर हॉटेलिंग मात्र महाग होऊ शकते.

Advertisement

व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2100 रुपयांच्या पुढे गेली

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाल्यानंतर देशाच्या राजधानीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 2101 रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी 1 नोव्हेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 266 रुपयांनी वाढ करण्यात आली होती आणि गॅसची किंमत 2000.50 रुपये होती.

महानगरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत

Advertisement

100 रुपयांच्या वाढीनंतर कोलकात्यात व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2177 रुपयांवर पोहोचली आहे, तर मुंबईत 19 किलोचा सिलेंडर 2051 रुपयांना विकला जात आहे. तर चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडरसाठी 2234 रुपये मोजावे लागणार आहेत.

सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येही दरात वाढ करण्यात आली होती

यापूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येही पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1 सप्टेंबरला 43 रुपयांनी आणि 1 ऑक्टोबरला 75 रुपयांनी वाढली होती.

Advertisement

घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले नाहीत

यावेळी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्ली आणि मुंबईमध्ये विनाअनुदानित 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत आता 899.50 रुपये आहे. कोलकातामध्ये घरगुती गॅसची किंमत 926 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये 14 किलोच्या सिलेंडरची किंमत 915.5 रुपये आहे.

तुमच्या शहरातील किमती खालील पद्धतीने तपासा

Advertisement

तुम्हाला तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाणून घ्यायच्या असतील, तर तुम्ही सरकारी तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ते पाहू शकता. यासाठी, तुम्हाला IOCL वेबसाइटला भेट द्यावी लागेल (cx.indianoil.in/webcenter/portal/Customer/pages_productprice). यानंतर, वेबसाइटवर राज्य, जिल्हा आणि डिस्ट्रीब्यूटर निवडा आणि नंतर सर्च वर क्लिक करा. यानंतर गॅस सिलिंडरच्या किमती तुमच्या समोर येतील.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker