गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा भडका; आज पुन्हा महागला, जाणून घ्या नवीन किंमत

MHLive24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आधीच पेट्रोल डिझेलने वरच्या स्तरावर किमती पोहोचवल्या आहेत. आता गॅसच्या किमतीदेखील भडकल्या आहेत. आज महिण्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना मोठा झटका बसणार आहे.

कारण आज पुन्हा सरकारी तेल कंपन्यांनी एकदा घरगुती एलपीजी सिलिडरच्या किमती वाढवल्या आहेत. विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 75 रुपयांनी वाढ झाली आहे.

दिल्लीत आता 14.2 किलोग्रॅमच्या विना सब्सिडी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलोग्रॅमच्या LPG Cylinder चा दर 884.50 रुपये इतका झाला आहे.

Advertisement

14.2 किलोग्रॅम असणाऱ्या नॉन सबसिडी एलपीजी गॅस सिलेंडरसाठी आणखी 25 रुपये भरावे लागणार आहेत. या किंमती आजपासून लागू होणार आहेत. वाढत्या किंमतीसह दिल्लीत आता घरगुती गॅस सिंलेडर 859 वरून 884 रुपये इतका झाला आहे. दिल्लीत गॅस सिलेंडरचा नवा दर 884.5 रुपये,मुंबईमध्ये गॅस सिंलेडर दर 884.5 रुपये असणार आहे.

अनुदानाशिवाय 14.2 किलो सिलिंडरची नवी किंमत :- दिल्लीमध्ये 14.2 किलो सिलिंडरची सबसिडीशिवाय किंमत 859.50 रुपयांवरून 884.50 रुपये झाली. कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत आता 875.50 रुपयांऐवजी 911 रुपये झाली, 900.5 रुपये मोजावे लागतील.

19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची नवी किंमत :- दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमत 1693 रुपये आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत कोलकातामध्ये 1,772 रुपये, मुंबईत 1,649 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,831 रुपये प्रति सिलिंडर आहे.

Advertisement

एलपीजी सिलिंडरमध्ये यावर्षी तब्बल 190.5 रुपयांनी झालीय वाढ :- यंदा अर्थात 2021 च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 694 रुपये होती, जी आता वाढून 884.50 रुपये झाली. अशा प्रकारे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत आतापर्यंत 9 महिन्यांत 190.50 रुपयांची वाढ झाली.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker