महागाईचा पुन्हा भडका होणार; ‘ह्या’ तारखेपासून गॅस आणि PNG खूप महागणार

MHLive24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- महागाईने सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडवले आहे. प्रथम बटाटे, नंतर कांदे आणि आता तेल महागले आहेत. महागाई आणि इंधनाच्या वाढत्या दरामुळे सध्या सामान्य नागरिकाचे हाल होत आहेत. त्यातच आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.(Gas and PNG will be very expensive )

कारण ऑक्टोबर महिन्यापासून घरगुती सिलेंडरच्या दर आणखी वाढतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये सीएनजी आणि पाईप गॅसची (पीएनजी) किंमत 10 ते 11 टक्क्यांनी वाढू शकते. एका अहवालानुसार ऑक्टोबर महिन्यात गॅसची किंमत 76 टक्क्यांनी वाढू शकते. देशांतर्गत गॅस धोरणानुसार दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या दरांचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार आता 1 ऑक्टोबरला गॅसचे नवे दर निश्चित केले जातील.

अ‍ॅडमिनिस्टर्ड रेट म्हणजे APM चा दर सध्या 1.79 डॉलर्स इतका आहे. 1 ऑक्टोबरपासून APM चा दर 3.15 डॉलर्स प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट इतका होईल. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या केजी-डी6 आणि बीपी पीएलसी (BP Plc) खोल समुद्रातील वायू क्षेत्रातून उत्खनन होणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत ऑक्टोबरपासून 7.4 एएमबीटीयू इतकी होईल. त्यामुळे आगामी काळात सर्व प्रकारच्या गॅसच्या किंमती 10 ते 11 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

दरम्यान, वाढत्या खाद्यतेलाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी आहे. खाद्यतेलांच्या किमतींवर अंकुश ठेवण्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार, ग्राहक मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र पाठवत व्यापाऱ्यांना दर आठवड्याला आपला स्टॉक जाहीर करण्यास सांगितले आहे.

आता सरकार कडधान्यांप्रमाणे तेलबियांचा साठा आणि किंमत तपासेल. राज्यांचे पुरवठा अधिकारी स्टॉक तपासतील आणि दराबाबत पुनरावलोकन करतील. सरकारने किंमती नियंत्रित करण्यासाठी आयात वाढवण्यासाठी विविध पावले उचलली आहेत.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker