गडकरीजी, देशभरात तुमचं स्थान कर्तृत्वानंः मुख्यमंत्र्यांकडून भरभरून काैतुक आणि अपेक्षा

MHLive24 टीम, 31 जुलै 2021 :- ‘स्वप्न पाहायलाही धाडस लागतं आणि स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अधिक मोठं धाडस लागतं. बाळासाहेब ठाकरे यांनी पुणे-मुंबई दोन तासांवर आणण्याची कल्पना मांडली. तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर म्हटला असता बघतो कसं शक्य आहे; पण तुम्ही तात्काळ सांगितलं मी करतो आणि करुन दाखवलं.

आता तीच एक तुमची ओळख तुम्ही देशभरात आपल्या कर्तृत्वाने निर्माण करत आहात. त्याबद्दल मला तुमचा अभिमान आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुक केलं.

दोन शहरांना आणखी जवळ आणले :- नागपूरमधील रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी गडकरी यांच्या कामाचे कौतुक केलं आहे. ‘भाजप- शिवसेनेचं जेव्हा युतीचं सरकार होतं तेव्हाचे दिवस मला आठवतात.

Advertisement

मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरं तुम्ही जोडली. आता तर अंतर कमी करुन तुम्ही ती अजून जवळ आणत आहात, असे ते म्हणाले. शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला बोलावंल. मला पुणे-मुंबईचा रस्ता सरळ पाहिजे, अशी इच्छा तुमच्याकडे व्यक्त केली.

या दोन्ही शहरांत ये-जा करण्यासाठी पाच- पाच तास लागायचे. रस्ते कोंडी व्हायची. हा प्रवास दोन तासावर आला पाहिजे, असं शिवसेनाप्रमुख तुम्हाला म्हणाले होते,’ अशी आठवण ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे.

नव्या तंत्रज्ञानासाठी तुमच्या मदतीची गरज :- ‘गडकरीजी मला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी आणत आहात. कितीही पाऊस पडला, तरी पुढची काही वर्षे रस्त्यावर खड्डा पडणार नाही, असं तुम्ही म्हणाला होतात. आता खड्ड्यांच्या पलिकडे जाऊन रस्तेच्या रस्ते खचत आहेत. तिथे तुमची मदत हवी. या वर्षीचं संकट निभावून नेऊ; पण पुढच्या वर्षी संकट आलं तर?

Advertisement

या वर्षीचा पावसाळा संपला नाही. अजून दोन तीन महिने आहेत. आपले रस्ते घाट खचले, पूल वाहून गेले. मला तुमच्या सर्व तंत्रज्ञानाची मदत हवी आहे. महाराष्ट्राला गरज आहे. जेणेकरून आता जे काही काम करू, ते पर्यावरणाला सांभाळून करू. जे काम केलं त्यात मजबुतीकरण कसं करू याची मदत तुमच्याकडून लागेल,’ अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker