Airtel Data Plans: एअरटेलचा बंपर धमाका! ‘ह्या’ प्रीपेड प्लॅन्समध्ये दररोज मिळेल मोफत डेटा

MHLive24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- सध्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच चढाओढ सुरु आहे. यातएअरटेल सध्या टॉप आहे. एअरटेलचा अशा प्रीपेड आणि पोस्टपेड योजना ऑफर करण्याचा नेहमीच प्रयत्न असतो ज्यामध्ये त्यांना कमी खर्चात अधिक फायदे मिळू शकतील. आज आपण याठिकाणी Airtel चे जे काही प्रीपेड प्लान्स आहेत, ज्यामध्ये फ्री डेटा दिला जातो त्या प्लॅन्सबद्दल सविस्तर जाणून घ्या (Airtel Data Plans)

एअरटेलच्या या प्लान्समध्ये फ्री डेटा मिळेल

एअरटेलने त्यांच्या काही प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत पण चार प्रीपेड प्लॅनचे डेटा बेनेफिट्स देखील अपग्रेड केले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की जर युजर्सने 265 रुपये, 299 रुपये, 719 रुपये किंवा 839 रुपयांचे प्रीपेड प्लान खरेदी केले तर त्यांना 0.5GB डेटा फ्री मिळेल.

Advertisement

एअरटेलचा 265 रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये, यूजरला 265 रुपयांच्या बदल्यात दररोज 1GB इंटरनेट, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस प्रतिदिन असे फायदे मिळतात.

जर वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या 500MB डेटाचा बेनिफीटसचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना यासाठी Airtel Thanks अॅप डाउनलोड करावे लागेल. यानंतर, तेथून रिडीम करून, वापरकर्ते दररोज एक ऐवजी 1.5GB डेटाचा लाभ घेऊ शकतात.

Advertisement

एअरटेलचा 299 रुपयांचा प्लान

या Airtel प्लॅनमध्ये, 299 रुपयांच्या बदल्यात दररोज 1.5GB इंटरनेट, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS चे फायदे मिळतात.

जर वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या 500MB डेटाचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना यासाठी Airtel Thanks अॅप डाउनलोड करावे लागेल. यानंतर, तेथून रिडीम करून, वापरकर्ते दररोज 1.5GB डेटाऐवजी 2GB इंटरनेटचा लाभ घेऊ शकतात.

Advertisement

एअरटेलचा 719 रुपयांचा प्लान

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये वापरकर्त्याला 719 रुपयांच्या बदल्यात दररोज 1GB इंटरनेट, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस प्रतिदिन असे फायदे मिळतात.

जर वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या 500MB डेटाचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना यासाठी Airtel Thanks अॅप डाउनलोड करावे लागेल. यानंतर, तेथून रिडीम करून, वापरकर्ते दररोज 1.5GB ऐवजी 2GB डेटाचा लाभ घेऊ शकतात.

Advertisement

एअरटेलचा 839 रुपयांचा प्लान

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये, वापरकर्त्याला दररोज 2GB इंटरनेट, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचे फायदे मिळतात. जर वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या 500MB डेटाचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना यासाठी Airtel Thanks अॅप डाउनलोड करावे लागेल. यानंतर, तेथून रिडीम करून, वापरकर्ते दररोज दोन ऐवजी 2.5GB डेटाचा लाभ घेऊ शकतात. या प्लानची किंमत 839 रुपये आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker