‘या’ इमारतीची लिफ्ट कोसळून चार ठार

MHLive24 टीम, 25 जुलै 2021 :- वरळीच्या हनुमान गल्लीमधील एका इमारतीची लिफ्ट कोसळून चाैघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ललित अंबिका असं या इमारतीचं नाव आहे. या इमारतीचं काम अद्याप सुरू आहे.

ही आहेत मृतांची नावे :- मृतांमध्ये अविनाश दास (35 वर्षे), भारत मंडल (27 वर्षे), चिन्मय मंडल (33 वर्षे) आणि एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

तर लक्ष्मण मंडल (35 वर्षे) ही व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना संध्याकाळी 5.45 च्या सुमारास घडली असून, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून मदतकार्य सुरू आहे.

Advertisement

सहा अ़डकले :- दरम्यान, अजूनही 6 जण आतमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने केईएम रुग्णालय आणि नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या इमारतीत पार्किंगचे बांधकाम सुरू होते. त्याच दरम्यान लिफ्ट कोसळली. दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून आत अडकलेल्या 6 जणांची सुटका करण्याचं काम अग्निशमन दलाने हाती घेतलं आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker