Mhlive24 टीम, 23 ऑक्टोबर 2020 :-  देशात कोरोनाचे संकट सुरु असतानाच क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे.भारतीय टीमचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांना ह्दयविकाराचा झटका आला आहे.

दिल्लीतील एका रूग्णालयात त्यांच्यावर अ‍ॅजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कपिल देव यांच्या नेतृत्वाखालीच भारतीय टीमनं विश्वचषक जिंकला होता.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,

पिल देव यांना ह्दयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सन 1983 मध्ये भारताला पहिला विश्वचषक जिंकून देण्यात कपिल देव यांचा मोठा वाटा होता.

कपिल देव यांनी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 131 कसोटी आणि 225 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 5248 धावा आणि 434 बळींची नोंद आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology