सहा हजार लीटर पेट्रोलमध्ये शिरले पुराचे पाणी

MHLive24 टीम, 24 जुलै 2021 :- उल्हास नदीच्या चौपाटीला लागूनच बदलापुरात नायरा कंपनीचा नव्यानंच उभारण्यात आलेला पेट्रोलपंप आहे. गुरुवारी उल्हास नदीच्या पुराचं पाणी बदलापूर शहरात शिरल्यानंतर सर्वात पहिला फटका हा या नायरा पेट्रोलपंपाला बसला. या पंपावर पुरामुळे तब्बल 6 फूट पाणी जमा झालं होतं.सहा हजार लीटर पेट्रोलमध्ये पाणी शिरले आहे.

लाखोंचे नुकसान :- बदलापूर शहराला उल्हास नदीच्या पुराचा मोठा तडाखा बसला. या पुरात बदलापूरच्या नायरा पेट्रोल पंपाला मोठा फटका बसला आहे. या पंपावर तब्बल सहा फूट पाणी साचलं होते. पंपावरील भूमिगत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या टाक्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे पेट्रोल पंपाचं लाखोचं नुकसान झालं आहे. या पंपाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

पेट्रोलपंप पुन्हा कधी सुरु होणार ? :- पंपावरील भूमिगत टाक्यांमध्ये 6 हजार लिटर पेट्रोल होतं. तर अडीच हजार लिटर डिझेल होतं. या सगळ्यामध्ये पाणी जाऊन मोठं नुकसान झालं आहे. आता पेट्रोलपंप पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी किमान 8 ते 10 दिवस लागणार असल्याची माहिती पेट्रोल पंप व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली.

Advertisement

जलशुद्धीकरण प्रकल्पातही पाणी शिरलं :- बदलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बॅरेज जलशुद्धीकरण प्रकल्पात पुरामुळे उल्हास नदीचं पाणी घुसलं. त्यामुळे या प्रकल्पातील जलशुद्धीकरण प्रकल्प अजूनही पाण्याखाली आहे. त्यामुळे पुराच्या संकटानंतर आता बदलापूरकरांवर ‘पाणी’संकट ओढवलं आहे.

या पुरात उल्हास नदीने 20.30 मीटरची पातळी गाठली होती. त्यामुळे बॅरेज धरणाच्या भिंतीवरून पाणी आत घुसण्यासाठी फक्त एक वीत अंतर शिल्लक होतं; मात्र तरीही बुधवारी मध्यरात्री खालच्या बाजूने जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी घुसलं. या पाण्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्पातील तिन्ही प्रक्रिया केंद्रात गढूळ पाणी शिरलं आणि प्रकल्प ठप्प झाला.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker